सिंबाच्या रिअल लाइफ 'अप्पी मा' ला पाहिलंय का? लेकाला स्टार करणारी माय आहे एकदम साधी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 04:46 PM2024-06-19T16:46:57+5:302024-06-19T16:53:16+5:30

Sairaj kendre: अनेक जण सध्या साईराजविषयी, त्याच्या कुटुंबाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे अप्पी आमची कलेक्टर.

या मालिकेत सध्या सिंबा म्हणजेच अमोल ही भूमिका साकारणाऱ्या बालकलाकाराने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

या मालिकेत अमोल ही भूमिका साईराज केंद्रे याने चिमुकल्याने साकारली आहे. विशेष म्हणजे इतक्या लहान वयात तो ज्या पद्धतीने अभिनय करतोय ते पाहून प्रेक्षक त्याच्यावर भलतेच खूश आहेत.

अनेक जण सध्या साईराजविषयी, त्याच्या कुटुंबाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

सध्या नेटकऱ्यांमध्ये साईराजच्या आईची चर्चा रंगलीये. त्याची आई कोण आहे, ती काय करते असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत.

साईराजच्या आईचं नाव भाग्यश्री केंद्रे असं असून ती सोशल मीडियावर सक्रीय आहे.

भाग्यश्री खऱ्या आयुष्यात अत्यंत साधी असल्याचं तिच्या फोटो वरुन चाहत्यांच्या लक्षात येतं.