जेठालालची काश्मिरी पत्नी 'गुलाबो' आठवतेय का? तिच्या सौंदर्यापुढे बबिताजीही पडेल फिकी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 11:52 AM2024-04-03T11:52:21+5:302024-04-03T12:35:26+5:30

'गुलाबो' म्हणजेच अभिनेत्री सिंपल कौल कुठे आहे गायब?

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील सर्वच कलाकार आज स्टार आहेत. त्यांची मोठी फॅन फॉलोइंग आहे. मालिकेत जेठालालची पत्नी दयाभाभी तर सगळ्यांनाच माहितच आहे. पण काही वर्षांपूर्वी मालिकेत दाखवलेली जेठालालची काश्मिरी पत्नी आठवतेय का?

अभिनेत्री सिंपल कौलने (Simple Kaul) 'गुलाबो' ही भूमिका साकारली होती. काश्मीरी लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसली. आपण जेठालालची पत्नी असल्याचा दावा तिने केला होता. ती जेठालालला 'सायबा' म्हणायची.

बऱ्याच वर्षांपूर्वी सिंपलने ही भूमिका साकारली होती. काही एपिसोड्सनंतर तिचं तिचं काम संपलं. मात्र नंतर ती सोशल मीडियावर खूपच फेमस झाली. खऱ्या आयुष्यात सिंपल किती ग्लॅमरस आहे याकडे चाहत्यांचं लक्ष गेलं.

सिंपलने 'कुसूम','शरारत','ये मेरी लाइफ है','बा बहू और बेबी' अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं. काही म्युझिक व्हिडिओमध्येही ती दिसली. पण आता सिंपल नक्की कुठे काय आहे?

2010 साली सिंपलने राहुल लुंबासोबत लग्न केले. ती आता फारशी अभिनयात नसून आपल्या व्यवसायाकडे जास्त लक्ष देत आहे. ती सध्या एक यशस्वी बिझनेसवुमन आहे. तिचे मुंबईत 3 रेस्टॉरंट आहेत.

नुकतंच टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत सिंपलने पुन्हा काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आता ती सिनेमा किंवा वेबसीरिजमधील चांगल्या प्रोजेक्ट्सच्या शोधात आहे. पैशांची कमी होऊ नये म्हणून ती सध्या बिझनेसवरच लक्ष देत आहे.

तारक मेहताच्या सेटवर तिलाही शोषणाचा सामना करावा लागला का असं तिला विचारण्यात आलं. यावर सिंपल म्हणाली,"मी फक्त २ महिनेच काम केलं होतं. माझी तिथे कोणाशीच मैत्री झाली नाही. कारण मला कोणाशी बोलायला वेळच नव्हता. त्यामुळे मला असा काहीच अनुभव आला नाही. पण या छोट्याशा भूमिकेने मला खूप प्रसिद्धी दिली. लोक आजही मला गुलाबो म्हणतात."