गायकवाडांची लेक होणार राजकीय कुटुंबाची सून! पाहा प्राजक्ता आणि शंभुराजचे रोमँटिक फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 10:25 IST2025-08-09T10:21:49+5:302025-08-09T10:25:24+5:30
Prajakta Gaikwad : अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा नुकताच साखरपुडा पार पडला असून तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव शंभुराज असं आहे.

स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील येसूबाईंच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिनं नुकतेच चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा नुकताच साखरपुडा पार पडला असून तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव शंभुराज असं आहे.
प्राजक्ता आणि शंभुराज यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
नुकतचे प्राजक्ता आणि शंभुराज यांचे साखरपुड्यातील वेगळ्या गेटअपमधील फोटो समोर आले आहेत.
यात प्राजक्ताने गोल्डन रंगाची साडी आणि त्यावर ब्राउन रंगाचा नक्षीकाम असलेला ब्लाउज परिधान केला आहे. तिला मॅचिंग करत शंभुराजने ऑफव्हाइट रंगाचा कुर्ता त्यावर गोल्डन जॅकेट असलेली शेरवानी घातली आहे.
या फोटोशूटमध्ये ते दोघे रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. त्यांची खूप छान केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.
प्राजक्ता आता राजकीय कुटुंबाची सून होणार आहे. लवकरच शंभुराजसोबत लग्नगाठ बांधून ती पुण्यातील फुरसुंगीची सून होणार आहे.
प्राजक्ताचा होणारा नवरा शंभूराज खुटवड हा पैलवान असून उद्योजक असल्याचं म्हटलं जातंय.
प्राजक्ताच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
प्राजक्ताच्या साखरपुड्यानंतर तिचे चाहते तिच्या लग्नाबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत.