ना टान्सपरंट ड्रेस ना अंगप्रदर्शन तरीही अभिनेत्रीने बोल्ड लूकमध्ये दिसणाऱ्या अभिनेत्रींना टाकले मागे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 14:08 IST2021-09-13T14:02:58+5:302021-09-13T14:08:20+5:30
ऑनस्क्रीन जितकी सुंदर दिव्यांका दिसते तितकीच ऑफस्क्रीन दिसते. या फोटोशूट दरम्यानचे फोटो पाहून चाहत्यांच्याही नजरा हटत नाहीत. दिव्यांकाच्या साडीपुढे इतर अभिनेत्रींच्या बिकीनी अदाही फिक्या पडतात.

आपला दमदार अभिनय आणि सोज्वळ सौंदर्याने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारी अभिनेत्री म्हणजे दिव्यांका त्रिपाठी.
तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.
सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते.
स्वतःचे फोटो आणि विचारही सोशल मीडियावर शेअर करते.
तिने शेअर केलेले सगळेच फोटो रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतात.
पारंपरिक असो किंवा वेस्टर्न तिचा प्रत्येक अंदाज खास असतो.
चाहत्यांची पसंती मिळवण्यासाठी बोल्ड लूकच गरजेचा असतो असे मानणा-या अभिनेत्रींना दिव्यांका टक्कर देते.
बोल्ड लूक गरजेचा नसून आपल्या मोहक सोज्वळ सौंदर्यानेही रसिकांची मनं जिंकू शकतो हे दिव्यांकाने सिद्ध करुन दाखवलं.