सखी-सुव्रतची प्यारवाली लव्हस्टोरी!! पाहा गोड जोडप्याचे रोमॅन्टिक फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 14:11 IST2021-07-27T13:56:06+5:302021-07-27T14:11:28+5:30
‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सखी गोखले (Sakhi Gokhale) हिचा वाढदिवस आहे.

‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सखी गोखले हिचा वाढदिवस आहे.
27 जुलै 1993 रोजी प्रसिद्ध अभिनेते मोहन गोखले आणि अभिनेत्री शुभांगी गोखले यांच्या घरी सखीचा जन्म झाला.
आईवडील हे दोघेही मराठीतील नामवंत कलाकार. त्यामुळे अभिनय सखीच्या रक्तातच आहे.
‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून सखी पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि घराघरांतील अविभाज्य भाग बनली. पुढे तिच्या आयुष्यात आला सुव्रत जोशी नावाचा एक हँडसम तरूण.
सखी आणि सुव्रतची लव्हस्टोरी फुलली ती ‘दिल दोस्ती दुनियादारी’च्या सेटवर. याच मालिकेच्या सेटवर दोघांची पहिली भेट झाली होती.
मालिकेत एकत्र काम करत असताना मैत्री झाली. पुढे अमर फोटो स्टुडियो या नाटकाच्या निमित्तानं प्रेम फुललं.
या नाटकादरम्यान सखी शिक्षणासाठी लंडनला गेली. याच दरम्यान सखी व सुव्रतच्या रिलेशनशिप असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. पण यावर दोघंही काही बोलणार तोच त्यांच्या लग्नाची गोड बातमीच चाहत्यांना मिळाली.
11 एप्रिल 2019 रोजी सखी व सुव्रतने लग्न करून चाहत्यांना एकच धक्का दिला. अचानक त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
या क्युट कपलचे अनेक फोटो त्यांच्या इन्स्टा अकाऊंटवर पाहायला मिळतात. या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते.
झी युवा वाहिनीवरील ‘दिल दोस्ती दुनियादारी’ ही सुव्रत व सखीची मालिका चांगलीच गाजली होती. मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर ‘दिल दोस्ती दोबारा’ हा दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.