१४ कोटींचं घर, लग्झरी कार अन् बरेच काही..; युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 12:40 PM2023-08-15T12:40:35+5:302023-08-15T12:43:42+5:30

बिग बॉस ओटीटी वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून शोमध्ये एन्ट्री केलेल्या एल्विश यादव(Elvish Yadav) विजयी झाला आहे. बिग बॉस शोच्या इतिहासात पहिल्यांदाच एका वाइल्ड कार्ड स्पर्धकानं ट्रॉफी जिंकलीय. २४ वर्षीय एल्विश यादव हरियाणातील गुरुग्राम इथं राहणारा आहे.

एल्विश हा युट्यूबर आणि सोशल मीडिया इंफ्लुएंसर आहे. २०१६ मध्ये त्याने युट्यूब व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. एल्विश आज सोशल मीडियातील स्टार आहे. जो युट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून दर महिन्याला लाखो रुपयांची कमाई करतो.

बिग बॉस ओटीटी स्पर्धा जिंकल्यानंतर एल्विश यादवला २५ लाखांचे इनाम मिळाले आहे. मात्र त्याची संपत्ती आणि कमाई पाहता ही रक्कम फार मोठी नाही. बिग बॉस शोमुळे एल्विश यादवच्या फॅन फोलाईंगमध्ये तगडी वाढ झाली आहे.

नेहमी त्याच्या लाईफस्टाईलनं आणि महागड्या कार कलेक्शनमुळे एल्विश चर्चेत असतो. त्याच्याकडे १.४१ कोटींची Porsche 718 Boxster कारसह अलीशान घरही आहे. हे सगळं त्याने युट्यूबवरील कमाईनं बनवले आहे.

एल्विश यादवच्या कलेक्शनमध्ये टोयोटा फॉर्च्युनर, हुंडई वेरणा, Porsche 718 Boxster यासारख्या लग्झरी कार आहेत. अलीकडेच एल्विशने गुडगाव इथं वजीराबादमध्ये अलीशान ४ मजली घर खरेदी केले. या घराची किंमत १२ ते १४ कोटी इतकी सांगितली जाते.

युट्यूबशिवाय एल्विश यादव याच्या उत्पन्नाचे अन्य सोर्सही आहेत. महिन्याला एल्विश जवळपास १०-१५ लाख कमाई करतो. त्याची संपत्ती ४० कोटीच्या आसपास आहे. खूप लहान वयात एल्विशनं कोट्यवधीचं साम्राज्य उभं केले.

युट्यूब क्रिएटर्स त्यांच्या कंटेटवर येणाऱ्या ADS मधून पैसे कमावतात. कॅटेगिरी, रिजन आणि अन्य आधारे ही कमाई निर्भर करते. अनेक कंटेट क्रिएटर्स Ads रेवेन्यूच्या ५५ टक्के कमाई करू शकतात. एल्विशचं क्लोदिंग ब्रँडही आहे ज्याचे नाव Systumm_Clothing आहे.

याशिवाय जाहिराती, हॉटेल, पेड स्पॉनशरशिपच्या माध्यमातून जोरदार कमाई करतो. युट्यूबवर एल्विशचे ३ चॅनेल आहेत. सर्व चॅनेल्सवर मिलियन्स फॉलोअर्स आहेत. एल्विश यादव सेलेब्सची रोस्टिंग व्हिडिओ बनवतो. ज्यातून तो सर्वात जास्त फेमस आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे १३ मिलियनहून अधिक फोलोअर्स आहे.

बिग बॉस ओटीटीचे विजेतेपद एल्विश यादवने जिंकले आहे. तर अभिषेक यादव फर्स्ट रनर राहिला. विजेत्या एल्विशला चषकासह २५ लाख रुपयांचं बक्षिस देण्यात आलं आहे. सोमवारी झालेल्या बिग बॉस ओटीटीच्या अंतिम फेरीत एकूण पाच स्पर्धक पोहोचले होते

एल्विश यादव हा एक प्रसिद्ध यूट्यूबर आहे. प्रभावशाली आहे ज्याने अनेक मजेदार व्हिडिओ तयार केले आहेत. त्याने बिग बॉस OTT मध्ये वाइल्ड कार्ड एंट्री केली होती. त्यांच्या यूट्यूबवर 4.7 मिलियन आणि 10 मिलियन फॉलोवर्स आहेत.