Bigg Boss OTT : आज ग्रॅण्ड प्रीमिअर; पाहा, आतून कसे दिसते बिग बॉसचे घर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 18:42 IST2021-08-08T12:49:16+5:302021-08-08T18:42:50+5:30

पाहा कार्निव्हल लूकमधलं Bigg Boss OTTचे घर

यंदाचा बिग बॉस शो टेलिव्हिजनवर येण्याआधीच खूप चर्चेत आला आहे. आज 8 ऑगस्टपासून हा शो वूट अ‍ॅपवर भेटीला येत आहे. आज 8 वाजता शोचा प्रीमिअर रंगणार आहे. रोज संध्याकाळी 7 ते 8 या शोचा रेकॉर्डेड स्पेशल एपिसोड तुम्हाला पाहायला मिळेल.

बिग बॉस ओटीटीवर करण जोहर हा शो होस्ट करताना दिसणार आहे. एक तासाच्या एपिसोड व्यतिरिक्त या शोमधील सर्व स्पर्धकांना 24 तास लाइव्ह पाहता येणार आहे. यासाठी तुम्हाला वूट अ‍ॅप इन्स्टॉल करावी लागेल. शिवाय सब्सक्रिप्शनही घ्यावे लागेल.

बिग बॉसचे नवे घर कसे असेल, या घरात कोण कोण असणार, कोणते नवीन नियम असतील असे एक ना अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले असतीलच. तर आता या घराचे इनसाईड फोटोही समोर आले आहेत.

या सीझनचे बिग बॉसचे घर अन्य सीझनप्रमाणे अलिशान व सुंदर आहे. यातील प्रत्येक गोष्ट लक्षवेधी आहे.

बिग बॉस ओटीटीचे घर अतिशय सुंदर पद्धतीने सजवण्यात आले आहे. स्पर्धकांच्या सुखसुविधांची खास काळजी घेण्यात आली आहे.

लिव्हिंग रूमचा एरिया फेस्टिवल थीमनुसार डेकोरेट करण्यात आला आहे.

यंदाच्या सीजनमध्ये घरातील सिटिंग अरेंजमेंट आणि फर्नीचर खूप भारी दिसत आहे. किचन, डायनिंग एरिया, गर्डन एरिया सर्व काही लक्ष वेधून घेत आहे.

घरातील किचन एरिया यावेळी वेगळ्या स्टाईलमध्ये सजवण्यात आल आहे.

स्पर्धकांसाठी खास सजवण्यात आलेली बेडरूममध्ये यावेळी असा नजारा दिसणार आहे.

स्पर्धकांसाठी खास जिम एरिया तयार करण्यात आला आहे. घराचे डिझाईन ओमंग कुमार आणि वनिता ओमंग कुमार यांनी केले आहे