मॉर्डन किचन, खास नेमप्लेट अन्...; फोटोंमधून पाहा रुचिरा जाधवच्या नव्या घराची झलक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 07:05 PM2024-04-14T19:05:00+5:302024-04-14T19:05:02+5:30

रुचिरा जाधवने खरेदी केलं नवीन घर! फोटोंतून दाखवली घराची झलक

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रुचिरा जाधव. या मालिकेने रुचिराला लोकप्रियता मिळवून दिली.

रुचिरा सोशल मीडियावर सक्रिय असते. रुचिराने नुकतीच एक खूशखबर चाहत्यांना दिली आहे. तिने गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर नवीन घर खरेदी केलं आहे.

नव्या घराचे फोटो रुचिराने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमधून रुचिराच्या घराची झलक पाहायला मिळत आहे.

रुचिराच्या नव्या घराचं नेमप्लेटही खास आहे. या नेमप्लेटवर तिचं नाव आणि श्रीकृष्णाचं मोरपीस पाहायला मिळत आहे.

या फोटोंमध्ये रुचिराच्या घरातील मॉडर्न किचनचीही झलक दिसत आहे. किचनमध्ये आकर्षक फर्निचर करण्यात आलं आहे.

घराचा एक कोपरा रुचिराने तिच्या ट्रॉफी ठेवून सजवला आहे.

तर दुसऱ्या भींतीवर तिच्या फोटोंच्या फ्रेम आणि कोलाज लावण्यात आलं आहे.

"ही शेवटची स्टेप नाही...पण, पहिली नक्कीच आहे. प्रत्येक स्टेप महत्त्वाची आहे," असं म्हणत रुचिराने तिच्या नव्या घराची झलकही दाखवली आहे.

रुचिराच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत तिचं अभिनंदन केलं आहे.

सध्या रुचिरा स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' मालिकेत काम करत आहे. तिने 'बिग बॉस मराठी ४'मध्येही सहभाग घेतला होता.