Bigg Boss Marathi 4 Winner: अक्षय केळकर झाला मालामाल! बिग बॅास विनरला किती रक्कम मिळाली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2023 23:46 IST2023-01-08T23:43:07+5:302023-01-08T23:46:37+5:30
Bigg Boss Marathi 4 Winner: अक्षय केळकर बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरला तर अपूर्वा नेमळेकरने पटकावले दुसरे स्थान.

बिग बॉस मराठीचा १०० दिवसांचा प्रवास आज संपला... १९ सदस्य आणि एक ट्रॉफी ! बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आलेला प्रत्येक सदस्य जिंकण्याचे ध्येय घेऊन घरात आला. पण आपल्याला माहिती होते महविजेता एकच असणार आहे आणि या पर्वाचा विजेता ठरलाय अक्षय केळकर (Akshay Kelkar).
खेळाडूवृत्ती, टास्क मधली मेहनत, स्पष्टवक्तेपणा यामुळे तो नेहेमीच चर्चेत राहिला. बिग बॉस मराठीच्या या पर्वामध्ये सदस्य म्हणून जाण्याची संधी त्याला मिळाली आणि आता तो या पर्वाचा विजेता ठरला.
अक्षय केळकर बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता तर अपूर्वा नेमळेकरने पटकावले दुसरे स्थान.
अक्षय केळकरला बिग बॉसची ट्रॉफी आणि १५ लाख ५५ हजार इतकी धनराशी मिळाली आहे.
इतकेच नाही तर पु.ना.गाडगीळ आणि सन्स तर्फे १० लाख रुपयांचे बंपर गिफ्ट व्हाउचर.
फनोलेक्स पाइप बेस्ट कॅप्टन ॲाफ सीझनसाठी ५ लाख रुपये मिळाले आहेत. अशारितीने अक्षय मालामाल झाला आहे.
अक्षय केळकर बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरल्यामुळे त्याचे चाहते खूप खूश आहेत.
सोशल मीडियावर चाहते आनंद व्यक्त करत अक्षयवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. तसेच अक्षयनेदेखील प्रेक्षकांचे आणि चाहत्यांचे आभार मानले आहेत.
अक्षय केळकरने सिनेइंडस्ट्रीत २०१३ साली छोट्या पडद्यावरुन एन्ट्री केली आहे. बे दुणे दहा ही त्याची पहिली मालिका. यात त्याने कबीरची भूमिका केली होती. त्यानंतर कमला या मालिकेत झळकला.
मालिकेशिवाय त्याने २०१४ साली प्रेमासाठी या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. याशिवाय तो कान्हा या चित्रपटात झळकला. तसेच कॉलेज कॅफे, माधुरी या चित्रपटातही त्याने काम केले. भाकरवडी या हिंदी मालिकेतही त्याने काम केले आहे.