Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठी ४चं घर पाहिलंत का? पाहा INSIDE PHOTOS
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2022 07:00 IST2022-10-02T07:00:00+5:302022-10-02T07:00:00+5:30
'बिग बाॅस मराठी' (Bigg Boss Marathi 4) या लोकप्रिय कार्यक्रमाचे चौथे पर्व आजपासून सुरु होणार आहे.

'बिग बाॅस मराठी' (Bigg Boss Marathi 4) या लोकप्रिय कार्यक्रमाचे चौथे पर्व आजपासून सुरु होणार आहे. २ ऑक्टोबर रोजी या कार्यक्रमाचा ग्रँड प्रीमियर होणार आहे. यंदाच्या सीझनमध्ये नेमके कोण कोणते स्पर्धक आहेत याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. काहींनी आपापले अंदाजदेखील वर्तवले आहेत.
तसेच बिग बॉसचे या सीझनचे घर कसे असणार आहे, हे देखील जाणून घेण्याची उत्सुकता आहे. दरम्यान आता 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या सीझनच्या घराची पहिली झलक समोर आली आहे.
बिग बॉस मराठी ४चे ग्रॅण्ड प्रीमियर आज पार पडणार आहे. या ग्रॅण्ड प्रीमियरच्या आधी बिग बॉस मराठीच्या यंदाच्या पर्वाच्या घराची झलक समोर आली आहे.
यंदाचं लिव्हिंग रुम गुलाबी,केशरी रंगाचं असून सोफादेखील त्याच रंगाचा आहे. तर गालिछा लाल आणि बेज कलरचा आहे. सोफ्याच्या समोरील भिंतीवर मिरर लावण्यात आले आहेत. त्याच भिंतीवर गोल्डन, केशरी आणि गुलाबी रंगाचे मुखवटे लावून भिंत सुशोभित केली आहे
लिव्हिंग रुममध्ये मोठं झुंबर लावलं आहे तेही फुलांनी बनवलेलं. तसेच एका भिंतीवर फुलांच्या गजऱ्याची कमान बनवली आहे.
एका बाजूला कलरफुल रिक्षादेखील पाहायला मिळत आहे.
तसेच एका बाजूला भिंतीवर मोठी नथदेखील पाहायला मिळत आहे.
तर दुसऱ्या एका फोटोत पाहायला मिळतंय की, दरवाजाच्या भोवती झाडांचा वापर करून सजावट करण्यात आली आहे. तर त्याच्या एका बाजूच्या भिंतीवर फुलांचे पेटिंग करण्यात आले आहे.
तर किचनची थीम पोपटी आणि पिवळ्या रंगाची केली आहे. एका साइडच्या भिंतीवर मोदक लावण्यात आले आहेत.
तर एका दरवाज्यावर आंब्यांचे चित्र लावण्यात आले आहे. तसेच एका बाजूला बरेच फ्लॉवर पॉट ठेवले आहेत. किचनमध्ये चिमणी, ओवन, शेगडी आणि मातीची भांडी, बाटली दिसत आहे. किचनमध्ये एक छोटासा सोफादेखील ठेवण्यात आला आहे.
बेडरुममध्ये एका बाजूला लाल रंगाची थीम केली आहे लाल रंगाच्या बेडच्या वरच्या बाजूला लाल रंगाचे पोपट पाहायला मिळत आहेत.
तर दुसऱ्या बाजूला पोपटी आणि पिवळ्या रंगाची थीम करण्यात आली आहे. त्या ठिकाणी बगळ्यांचं चित्र पाहायला मिळतंय.
बेडरुममध्ये एका बाजूला वेगवेगळ्या बऱ्याच लोकांच्या डोळ्यांचे फोटो लावले आहेत. त्यामुळे बेडरुममधील हा भाग लक्षवेधी ठरतो आहे.
बिग बॉस मराठी शोमध्ये दरवर्षी वेगवेगळ्या थीमचे घर असते. यंदादेखील बिग बॉसचं घर हटके दिसत आहे. घराची झलक तर पाहायला मिळाली, मात्र या घरात यंदा कोण कोणते कलाकार पाहायला मिळणार हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.