PICS : ‘शाह’ आणि मराठमोळी कशी? कोण आहे ‘बिग बॉस मराठी3’ची स्पर्धक मिनल शाह?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 14:46 IST2021-09-20T14:23:32+5:302021-09-20T14:46:59+5:30

Bigg Boss Marathi 3 : हा चेहरा तुम्ही एमटीव्हीवरच्या रोडिजमध्ये पाहिला असेलच... जाणून घ्या तिच्याबद्दल...

अनेक दिवस प्रेक्षकांची उत्कंठा ताणून धरणा-या ‘बिग बॉस मराठी3’चे स्पर्धक कोण असणार यावरून आता पडदा उठला आहे.

मराठी आणि हिंदीच्या छोट्या पडद्यावर नशीब आजमावणा-या अनेक लोकप्रिय कलाकारांचा या सिजनमध्ये समावेश आहे, यातल्याच एका चेह-याला तुम्ही एमटीव्हीवरच्या रोडिजमध्ये पाहिलं असेल. होय ती कोण तर मिनल शाह.

मुंबईची मराठमोळी मुलगी मिनल शाह हिचा देखील या स्पर्धकांमध्ये समावेश आहे. आता ‘शाह’ आणि मराठमोळी कशी? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर आज तेच तुम्हाला सांगणार आहोत.

मिनलचे शालेय शिक्षण हे वांद्रे पूर्व येथील आयईएस न्यू इंग्लिश स्कुलमध्ये मराठी माध्यमात झाले आहे. लहानपणापासूनच तिच्यावर मराठी संस्कृती आणि भाषेचे संस्कार झालेत.

मिनलचे वडील गुजराती. पण आई मराठी असल्यामुळे, आईने अगदी जाणीवपूर्वक मीनलवर मराठी संस्कार केलेत. तिला मराठमोळ्या संस्कृतीत रूळवलं.

मिनल लहान असताना तिचे आई वडील वेगळे झाले होते. तेव्हापासून ती आणि तिचा भाऊ आईसोबत राहत आहेत.

मिनल ही एमटीव्ही रोडीज स्टार असून, तिने अनेक कठीण स्टंट करून सेमीफायनल मध्ये जागा मिळवली होती.

मिनल सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. ‘बिग बॉस मराठी3’मध्ये मिनल काय कमाल करते हे पाहणे निश्चितपणे इंटरेस्टिंग असणार आहे.