'बालिका वधू'मधील छोटी 'आनंदी' सध्या काय करते? समय रैनासोबत आहे खास कनेक्शन

By देवेंद्र जाधव | Updated: February 12, 2025 18:15 IST2025-02-12T17:47:02+5:302025-02-12T18:15:30+5:30

'बालिका वधू' मालिका सर्वांनी पाहिली असेलच. या मालिकेत आनंदीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सध्या काय करते माहितीये? (avika gor)

'बालिका वधू' मालिका सर्वांना आठवत असेलच. या मालिकेत छोट्या आनंदीची साकारलेली बालकलाकार प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय झाली

'बालिका वधू' मालिकेत आनंदीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव आहे अविका गौर. अविकाने साकारलेली आनंदीची भूमिका सर्वांची फेव्हरेट ठरली.

अविकाने शाहिद कपूरसोबत 'पाठशाला' सिनेमातही काम केलं होतं. अविका सध्या काय करते असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आम्ही याचं उत्तर देतो.

अविका काहीच दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या 'इंडियाज गॉट लेटन्ट'च्या एपिसोडमध्ये दिसली. अविका आणि समय रैना यांच्यातील मैत्रीपूर्ण केमिस्ट्री यावेळी पाहायला मिळाली.

अविका आणि समय रैनाने इंडियाज गॉट लेटन्टच्या एपिसोडमध्ये धमाल केलेली दिसली. अविकाचं हे रुप पाहून सर्वांना आनंद झाला

अविका गौरने गेल्या काही वर्षांमध्ये अनेक बॉलिवूड सिनेमांमध्येही काम केलंय. अविकाची भूमिका असलेला 'ब्लडी इश्क' सिनेमा प्रचंड गाजला.

अविका गौर अनेक बॉलिवूड आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील इव्हेंट्समध्ये तिच्या ग्लॅमरस रुपात हजेरी लावताना दिसते. अविका 'छोटी आनंदी' म्हणून सर्वांच्या कायम लक्षात असेल