वेगळं राहण्यासाठी लग्न केलं का? प्रसादची तक्रार; अमृता देखमुखने सांगितलं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 14:33 IST2025-09-08T14:24:59+5:302025-09-08T14:33:02+5:30
प्रसाद साताऱ्याला तर अमृता पुणे-मुंबईत, एकमेकांना कसा वेळ देतात हे लव्हबर्ड्स?

'बिग बॉस मराठी ४' पर्वातील रोमँटिक जोडी प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख. या गोड जोडीने या पर्वात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. बाहेर आल्यानंतरही यांची जोडी टिकून राहिली.
१८ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रसाद आणि अमृता यांनी लग्नगाठ बांधली. चाहत्यांनी त्यांना 'प्रमृता' असं नाव दिलं आहे. दोघांचा चाहतावर्गही मोठा आहे.
लग्नानंतर काहीच महिन्यात प्रसादला 'पारु' ही झी मराठीवरील मालिका ऑफर झाली. या मालिकेत तो मुख्य भूमिकेत आहे. तर अमृताची संकर्षण कऱ्हाडेच्या 'नियम व अटी लागू' नाटकात एन्ट्री झाली.
दोघंही आपापल्या प्रोजेक्टमध्ये व्यग्र झाले. प्रसादला मालिकेच्या शूटसाठी साताऱ्याला शिफ्ट व्हावं लागलं. मग अशा परिस्थितीत दोघं एकमेकांना कसे वेळ देता. लग्नानंतरही वेगळं राहण्याची वेळ आली यावर त्यांचं मत काय या सगळ्यावर अमृता देशमुखने भाष्य केलं आहे.
नुकतंच 'सर्व काही' या पॉडकास्टमध्ये अमृता म्हणाली, "मी मुंबईत असते आणि प्रसाद साताऱ्याला असतो. आमचं आताच लग्न झालं आहे पण आम्ही लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहोत."
"प्रसादचं तर ठाम मत असतं की मी वेगवेगळं राहण्यासाठी लग्न केलं का? मला लग्न केलं कारण मला एकत्र राहायचं होतं. एकत्र सहवास हवा होता."
"पण लग्नावर कमी खर्च केला असता तर आपण लगेच प्रोजेक्ट स्वीकारले नसते. ठिके, आता चांगली संधी मिळालीच आहे तर काय हरकत आहे. अशा संधी आपल्या क्षेत्रात फार क्वचित येते."
"भलेही तो प्रोजेक्ट घेतल्याने काही गोष्टी कम्फर्ट वाटणाऱ्या नसतील तरी ती भूमिका छान असते कधी चॅनल चांगलं असतं. या गोष्टींचा विचार करुन ते स्वीकारावं लागतं."
"मग आम्ही जसा वेळ मिळतो तसं भेटतो. मला सुट्टी असली की मी साताऱ्याला जाते. प्रसादला सुट्टी मिळताच क्षणी मिळेल ती बस पकडून तो मुंबई किंवा पुण्याला येतो. दोघांनाही तेवढी ओढ आहे त्यामुळे लाँग डिस्टन्स तेवढं वाटत नाही."