सुबोध भावेच्या ऑनस्क्रीन बहिणीचा ग्लॅमरस अन् बोल्ड लूक! समुद्रकिनारी केलं फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 14:06 IST2026-02-27T13:53:03+5:302026-02-27T14:06:33+5:30

दिसायला सुंदर आणि कमालीची फिट आहे 'ही' अभिनेत्री

'कुन्या राजाची गं तू राणी', 'रात्रीस खेळ चाले' तसेच 'तुला पाहते रे' यांसारख्या मालिकांमधून अभिनेत्री पूर्णिमा डे प्रसिद्धीझोतात आलेली मराठी अभिनेत्री पूर्णिमा डे.

सध्या पूर्णिमा झी मराठीवरील 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत दिसत आहे. यात ती सुबोध भावेच्या बहिणीच्या भूमिकेत आहे.

पूर्णिमा दिसायला कमालीची फिट आहे. ती स्वत: प्रोफेशनल डाएटिशियन आहे.

तसंच तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट पाहिलं तर त्यावर तिने अनेक ग्लॅमरस, बोल्ड लूकमधील फोटो शेअर केले आहेत. तिची तजेलदार त्वचा, टोन्ड फिगर यामुळे ती कमालीची सुंदर दिसते.

आताही तिने समुद्रकिनारी काढलेले हे सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. आकाशी रंगाचा डीप नेक ब्रालेट टॉप आणि व्हाईट रंगाची लूज पलाजो असा तिचा ग्लॅमरस लूक आहे

मागे निळाशार समुद्र, तळपतं ऊन तरी पूर्णिमा मात्र एकदम फ्रेश लूकमध्ये दिसत आहे. ती बीचवर मस्त एन्जॉय करत आहे.

'सन, सँड अँड स्टोरीलाईन' असं कॅप्शन तिने फोटोंना दिलं आहे. या फोटोंवर तिला 'फायर गर्ल','सुपर क्लिक','ब्युटिफूल' अशा कमेंट्स आल्या आहेत.