अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरच्या नो मेकअप लूकची होतेय सर्वत्र चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 22:27 IST2021-12-07T22:17:48+5:302021-12-07T22:27:53+5:30
अपूर्वा नेमळेकरच्या विना मेकअप लूकला चाहत्यांची पसंती मिळते आहे.

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सातत्याने वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते.
अपूर्वा नेमळेकरने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर नो मेकअप लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
अपूर्वाच्या नो मेकअप लूकमधील फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे.
अपूर्वाच्या नो मेकअप लूकमधील फोटोंची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे.
अपूर्वा नेमळेकरला रात्रीस खेळ चाले मालिकेतील शेवंताच्या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळाली.
अपूर्वा नेमळेकर हिने रात्रीस खेळ चाले ३ मालिका नुकतीच सोडली आहे. आता तिच्या भूमिकेत अभिनेत्री कृतिका तुळसकर पाहायला मिळते आहे.
अपूर्वा नेमळेकरने मालिका सोडल्यामुळे तिचे चाहते नाराज झाले आहेत.
आता अपूर्वा ऑनस्क्रीन दिसत नसली तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.