२२ वर्षांची अभिनेत्री इंडियन क्रिकेटरसोबत थाटणार संसार, साखरपुड्याचे फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 16:17 IST2026-03-09T16:11:40+5:302026-03-09T16:17:30+5:30

रविवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या फायनलमध्ये भारताने न्यूझीलंडवर मात करत टी २० वर्ल्डकप नावावर केला. तर दुसरीकडे एका इंडियन क्रिकेटरने गुडन्यूज दिली आहे.

रविवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या फायनलमध्ये भारताने न्यूझीलंडवर मात करत टी २० वर्ल्डकप नावावर केला. तर दुसरीकडे एका इंडियन क्रिकेटरने गुडन्यूज दिली आहे.

इंडियन क्रिकेटर पृथ्वी शॉने गुपचूप साखरपुडा केला आहे. पृथ्वी शॉने गर्लफ्रेंड आकृती अग्रवालसोबत साखरपुडा केला आहे.

पृथ्वी शॉ आणि आकृतीने सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांच्या साखरपुड्याबद्दल चाहत्यांना माहिती दिली.

आकृती ही लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. तिचे इन्स्टाग्रामवर ३.२ मिलियन फॉलोवर्स आहेत.

तिचं युट्यूब चॅनेलही आहे. याशिवाय आकृती लवकरच अभिनयातही पदार्पण करत आहे.

आकृती त्रिमुखा या तेलुगु सिनेमातून पदार्पण करत आहे. लवकरच तिचा हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

आकृती अग्रवाल ही २२ वर्षांची असून ती २ मे २००३ रोजी तिचा जन्म झाला होता. तिने बीएमएसचं शिक्षण घेतलं आहे.

पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल बऱ्याच दिवसांपासून एकमेकांसोबत डेट करत होते. आता ते लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.

आकृती आणि पृथ्वी शॉमध्ये ४ वर्षांचं अंतर आहे. पृथ्वी शॉ २६ वर्षांचा आहे तर आकृती २२ वर्षांची आहे.