देखणं ते रूप...' 'हीरामंडी' फेम अभिनेत्रीचा पारंपरिक अंदाज, फोटोंनी वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 05:34 PM2024-05-02T17:34:27+5:302024-05-02T17:42:18+5:30

टीव्ही अभिनेत्री संजीदा शेख तिच्या जबरदस्त अभिनयासाठी ओळखली जाते.

अभिनयाबरोबरच ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याची पाहायला मिळते.

अभिनेत्री संजीदा शेख अभिनेता हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोणसोबत 'फाइटर' सिनेमामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती.

सध्या अभिनेत्री संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी' या वेबसिरीजमुळे चर्चेत आहे.

नुकतेच संजीदाने सोशल मीडियावर तिचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केलेत.

आपल्या एक्सप्रेशनमुळे चाहत्यांना घायाळ करत तिने त्यांच्या मनाचा ठाव घेतला आहे.

पिवळ्या रंगाची साडी त्यावर ऑफ शोल्डर ब्लाऊज तसेच कानात झुमके असा पारंपरिक पेहराव करत तिने नवं फोटोशूट केलंय.

'क्या होगा निम्मो का','नच बलिए' तसेच 'लव्ह का है इंतजार' यांसारख्या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.