तैमुर अली खान आणि सैफ अली खान यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील पडाल तैमुरच्या प्रेमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2018 17:51 IST2018-12-14T17:43:07+5:302018-12-14T17:51:04+5:30

सैफ अली खान आणि करिना कपूर यांच्या इतकाच त्यांचा मुलगा तैमुरदेखील सध्या स्टार झाला आहे.
तैमुरला नुकतेच सैफ अली खानसोबत फिरताना पाहाण्यात आले.
विशेष म्हणजे यावेळी मुलगा आणि वडिलांनी दोघांनी देखील पांढऱ्या रंगाचे कपडे घातले होते.
तैमुर नेहमीसारखाच चांगल्या मुडमध्ये दिसला. त्याने फोटोग्राफर्सना अनेक फोटो देखील काढून दिले
तैमुरला खांद्यावर घेऊन सैफ त्याला फिरायला घेऊन गेला होता.
सैफ अली कामात व्यग्र असला तरी तो नेहमीच त्याच्या मुलासोबत वेळ घालवतो. यावेळी त्यांची क्यूट बाँडिंग देखील पाहायला मिळाली.