PICS : सुशांत सिंग राजपूतच्या आठवणीत अशी झाली अंकिता लोखंडेची अवस्था, केले कुटुंबीयांचे सांत्वन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 16:58 IST2020-06-16T16:48:01+5:302020-06-16T16:58:06+5:30

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. काल त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झालेत. सुशांतची पुर्वाश्रमीची गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे सुशांतच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी पोहोचली.

आज अनेकांनी सुशांतच्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये जात त्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. अंकिता लोखंडे सुद्धा सुशांतच्या घराबाहेर दिसली.

सुशांतच्या आत्महत्येने अंकिताला मोठा धक्का बसला आहे, आज सुशांतच्या कुटुंबीयांना भेटायला जातात तिच्या चेह-यावर दु:ख स्पष्ट दिसत होते.

‘इंडिया टूडे’ने सुशांतच्या निधनावर एक्स गर्लफ्रेंड अंकिताची प्रतिक्रिया घेण्यासाठी तिच्याशी संपर्क साधला होता. त्यावेळी तिला सुशांतने आत्महत्या केल्याचे माहितच नव्हते. तिने ‘काय?’ एवढा एकच शब्द बोलून फोन कट केला होता.

कधीकाळी सुशांत व अंकिता रिलेशनशिपमध्ये होते.

पवित्र रिश्ता या मालिकेच्या सेटवर ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते.

जवळजवळ 6 वर्षे हे दोघे लिव्ह इनमध्ये राहिले होते.

‘पवित्र रिश्ता’नंतर ‘झलक दिखला जा’ या रिअ‍ॅलिटी शोमध्येही अंकिता व सुशांत सहभागी झाले होते. याच मंचावर सुशांतने अंकिताला प्रपोज केले होते.

मात्र सुशांत टीव्ही सोडून बॉलिवूडमध्ये गेला आणि दोघांच्या नात्यात दुरावा येवू लागला.