सुशांतच्या निधनामुळे भावूक झाली त्याची बहिण, म्हणाली - माझा बाबू...काश..तुझे सर्व दुःख मी घेऊ शकले असते 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 19:39 IST2020-06-18T19:39:10+5:302020-06-18T19:39:10+5:30

सुशांतच्या निधनानंतर त्यांची बहिण खूप दुःखी झाली. श्वेता सिंग किर्ती यांनी सुशांतच्या आठवणीत इमोशनल पोस्ट लिहिली आहे.

त्यांनी लिहिले की, माझा बेबी, बाबू, माझे बाळ आता आमच्यात शारिरीकरित्या उपस्थित नाही. मला माहित आहे की तू खूप दुःखात होतास आणि मला माहित आहे की तू एक फायटर होतास आणि शूरतेने लढत होता.

मला माफ कर माझ्या सोना...ज्या पण त्रासातून तू गेलास, त्यासाठी मी माफी मागते. काश मी तूझे सगळे दुःख घेऊ शकले असते ्आणि माझा आनंद तुला दिला असता.

तुझ्या चमकत्या डोळ्यांनी जगाला स्वप्न पहायला शिकवले आहे. तुझे मासूम हास्याने तूझे मन साफ असल्याचे दाखवले. नेहमीच तुझ्यावर प्रेम केले जाईल बेबी आणि खूप खूप जास्त प्रेम केले जाईल. तू जिथे असशील तिथे खूश राहशील.

सुशांतची बहिण परदेशात असते आणि ती सुशांतसोबतचे फोटो शेअर करत असते.

अभिनेता सुशांत सिंग राजपूतने 14 जून रोजी आत्महत्या केली.