लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 20:20 IST2026-01-14T20:14:29+5:302026-01-14T20:20:52+5:30
Sara Arjun Latest Photos: लहानपणी आपल्या निरागस अभिनयाने मनं जिंकणारी सारा अर्जुन आता एका वेगळ्या आणि सुपरहॉट अवतारात समोर आली आहे.

रणवीर सिंगसोबतच्या पहिल्याच चित्रपटातून सारा अर्जुनने बॉलिवूडमध्ये दिमाखदार एन्ट्री केली असून, तिचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे.

साराने १३ जानेवारी रोजी इंस्टाग्रामवर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. यात तिने लाल रंगाचा बॅकलेस ड्रेस परिधान केला असून ती अत्यंत ग्लॅमरस आणि सुंदर दिसत आहे.

पदार्पणातच सारा 'सोशल मीडिया सेन्सेशन' बनली असून, तिचा हा नवीन लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत. तिच्या सौंदर्याची प्रतिमा चाहत्यांच्या मनात घर करून बसली आहे.

फोटोंना कॅप्शन देताना साराने दोन मेणबत्त्या आणि गुलाबाचे इमोजी वापरले आहेत. यावरून ती तिच्या पुढच्या मोठ्या प्रोजेक्टची तयारी करत असल्याचे संकेत मिळत आहेत.

चित्रपटात सारा अर्जुनने मुख्य नायकाची प्रेयसी साकारली आहे. चित्रपटात ती बहुतेक वेळा एथनिक लूकमध्ये दिसली होती, मात्र तिचा हा मॉडर्न अवतार चाहत्यांना अधिक भावला आहे.

साराच्या या फोटोंवर 'धुरंधर'मधील तिचा सह-कलाकार दानिश पांडोर याने हार्ट इमोजी पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे, ज्यामुळे या मैत्रीची चर्चा रंगली आहे.

साराच्या या बोल्ड फोटोशूटवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे. काही युजर्सनी कमेंट्समध्ये तिला सुपरहॉट आणि सुंदर म्हटले आहे.

'धुरंधर' चित्रपट ब्लॉकबस्टर ठरल्याने त्याचा फायदा साराच्या आगामी चित्रपटांना नक्कीच होईल, असा अंदाज चित्रपट तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

















