अप्सरा आली...! डिझायनर गाऊनमध्ये सोनालीचं जबरदस्त फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2024 17:00 IST2024-05-26T17:00:00+5:302024-05-26T17:00:00+5:30

Sonalee kulkarni: लाल रंगाच्या डिझायनर ड्रेसमध्ये सोनालीने फोटोशूट केलं आहे. या ड्रेसवर मोती आणि खड्यांचं सुरेख वर्क केलं आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. मराठी इंडस्ट्रीची अप्सरा म्हणूनही ती ओळखली जाते.

मराठीसह सोनालीने दाक्षिणात्य कलाविश्वातही सक्रीय आहे. अलिकडेच तिचा मल्याळम सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला.

सोनालीचा सोशल मीडियावर दांडगा वावर आहे. त्यामुळे ती कायम चाहत्यांच्या चर्चेत असते.

अलिकडेच सोनालीने तिचा वाढदिवस साजरा केला. यातील काही निवडक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.

नुकतंच तिने ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

लाल रंगाच्या डिझायनर ड्रेसमध्ये सोनालीने फोटोशूट केलं आहे. सोनालीच्या ड्रेसवर मोती आणि खड्यांचं सुरेख वर्क केलं आहे.

सोनालीने या फोटोशूटमध्ये हटके पोझ दिल्या आहेत.