'हिरवी साडी अन् केसात गुलाब...' श्रीवल्लीचं मनमोहक सौंदर्य; हार्टशेप बॅगने वेधलं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 16:37 IST2024-07-29T16:26:24+5:302024-07-29T16:37:51+5:30
दक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रश्मिका मंदाना. सोशल मीडियावर अभिनेत्री कायमच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते.

रश्मिका मंदाना तिची स्टाईल आणि फॅशन सेन्समुळे देखील लाईमलाइटमध्ये येत असते.
अभिनयाबरोबरच नेटकऱ्यांमध्ये कायमच श्रीवल्लीच्या सौंदर्याची चर्चा रंगताना पाहायला मिळते.
सोशल मीडियावर अभिनेत्रीची तगडी फॅन फॉलोइंगही आहे.
सध्या सोशल मीडियावर अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. या फोटोंमधील अभिनेत्रीचा साडीतील लूक नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे.
या फोटोंमध्ये तिने हिरव्या रंगाची साडी तसेच त्यावर स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे.
त्यासोबत तिच्या या लूकला मॅचिंग अशी हार्टशेप बॅग देखील बनवली आहे. या बॅगवर तिच्या नावातील 'RM' अशा मुख्य अक्षरांच शिवणकाम केल्याचं पाहायला मिळतंय.
रश्मिका मंदानाचे हे व्हायरल फोटो पाहून नेटकऱ्यांचा काळजाचा ठोका चुकला आहे.
केसात गुलाब आणि हिरव्या साडीमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य खुललं आहे.