साधी अन् तितकीच सोज्वळ! 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीची पत्नी दिसायला खूप सुंदर! जोडप्याचे फोटो होतायेत व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 16:45 IST2025-10-03T16:28:24+5:302025-10-03T16:45:16+5:30
'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीच्या पत्नीला पाहिलंत का? सौंदर्यात अभिनेत्रींना देते टक्कर; जोडप्याचे फोटो होतायेत व्हायरल

अभिनेता ऋषभ शेट्टीची मुख्य भूमिका असलेला 'कांतारा चॅप्टर १' हा चित्रपट २ ऑक्टोबरला जगभरात प्रदर्शित झाला आहे.
ब्लॉकबस्टर ठरलेल्या कन्नड चित्रपट 'कांतरा'प्रमाणे त्याचा सीक्वल देखील सिनेरसिकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. 'शिवा'ची भूमिका साकारणाऱ्या ऋषभ शेट्टीने पुन्हा एकदा जबरदस्त, भावनिक आणि प्रभावी अभिनय केला आहे.
या चित्रपटामुळे अभिनेता सर्वत्र ऋषभ शेट्टीची चर्चा सुरू आहे. चाहते त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहेत.
ऋषभ शेट्टीच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल सर्वांना माहिती आहे, पण त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.
दरम्यान, ऋषभ शेट्टी वैयक्तिक आयुष्यात विवाहित असून त्याच्या पत्नीचं नाव प्रगती शेट्टी आहे. २०१७ मध्ये ऋषभ आणि प्रगतीने लग्न केलं.या जोडप्याला २ मुले आहेत.
सोशल मीडियावर या जोडप्याचे अनेक फोटो,व्हिडीओ व्हायरल होत असतात.ऋषभ शेट्टीची पत्नी दिसायला खूप सुंदर आहे. प्रगती शेट्टी कॉस्ट्यूम डिझायनर आहे.
प्रगती शेट्टी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असल्याची पाहायला मिळते. अभिनेत्याची पत्नी साधेपणाचं नेहमीच कौतुक होत असतं.