मलेशियात बोल्ड झाली समांथा, बिकिनीतील फोटोंनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2024 10:47 IST2024-02-24T10:13:06+5:302024-02-24T10:47:37+5:30
मलेशियात समांथाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला. मेडिटेशन करण्याबरोबरच समांथाने बिकिनी घालत तलावात डुबकी मारली.

समांथा रुथ प्रभू ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम करून समांथाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली.
गेल्या काही महिन्यांपासून समांथा सिनेसृष्टीपासून दूर आहे. मायोसायटिस या आजारानंतर समांथाने काही वेळ अभिनयातून ब्रेक घेत स्वत:वर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं होतं.
या काळात समांथाने मेडिटेशन केलं. याचे फोटोही तिने शेअर केले होते. काहीच दिवसांपूर्वी तिने पुन्हा कामावर परतणार असल्याचं सांगितलं होतं.
समांथा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नुकतेच तिने मलेशिया ट्रिपचे काही फोटो शेअर केले आहेत.
अभिनयाबरोबरच समांथा तिच्या बोल्डनेससाठीही ओळखली जाते. अनेकदा समांथा तिचे बोल्ड फोटोही शेअर करताना दिसते.
आताही मलेशियात समांथाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला. मेडिटेशन करण्याबरोबरच समांथाने बिकिनी घालत तलावात डुबकी मारली. याचे फोटो तिने शेअर केले आहेत.
फोटोमध्ये समांथाने चॉकलेटी रंगाची बिकिनी घातल्याचं दिसत आहे. तिचा बोल्डनेस पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
समांथाच्या बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.