Photos: ना हातभर मेहेंदी, ना कसलं डिझाइन! रश्मिकाने लग्नाच्या मेहेंदीमध्येही जपली संस्कृती, होतेय चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 17:56 IST2026-03-11T17:52:20+5:302026-03-11T17:56:26+5:30
रश्मिका-विजयने मेहेंदी सोहळ्यातील खास क्षण शेअर केले आहेत.

साऊथ सिनेसृष्टीतील ब्युटिफूल कपल रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा २६ फेब्रुवारीला लग्नाच्या बेडीत अडकले. त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले होते.

आता त्यांच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत. रश्मिका-विजयने मेहेंदी सोहळ्यातील खास क्षण शेअर केले आहेत.

या मेहेंदी सोहळ्यालाही रश्मिका-विजयने पारंपरिक लूक केल्याचं दिसलं. रश्मिकाने लेहेंगा घातला होता.

तर विजयने साऊथची परंपरा जपत लुंगी आणि जॅकेट असा लूक केला होता.

या सगळ्या फोटोंमध्ये लक्ष वेधून घेतलं ते रश्मिकाच्या मेहेंदीने. लग्नाच्या मेहेंदीतही तिने संस्कृती जपली.

रश्मिकाने हातभर मेहेंदी न काढता एका हातावर ओम तर दुसऱ्या हातावर देवी अशी मेहेंदी काढली होती.

अभिनेत्रीच्या साधेपणाचं आणि तिने जपलेल्या संस्कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे.

















