रश्मिकाच्या माहेरच्या नातेवाईकांसाठी कुर्गमध्ये शाही रिसेप्शन! वडिलांनी जावई अन् लेकीला दिली 'ही' खास भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 11:09 IST2026-04-08T10:54:51+5:302026-04-08T11:09:14+5:30

रश्मिकाच्या मुळं गावी कुर्गमध्ये रिसेप्शनचा शाही थाट; पाहा खास फोटो

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लाडकं जोडपं रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि विजय देवराकोंडा (Vijay Deverakonda) सध्या चर्चेत आहे.

२६ फेब्रुवारी २०२६ रोजी उदयपूरमध्ये झालेल्या त्यांच्या लग्नसोहळ्यानंतर हैदराबादमध्ये ग्रँड रिसेप्शन पार पडलं होतं.

त्यानंतर आता या जोडीसाठी कर्नाटकातील कुर्ग येथे आणखी एक खासगी रिसेप्शन आयोजित करण्यात आलं.

रश्मिकाच्या मूळ गावी झालेल्या या सोहळ्याला फक्त कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. या सोहळ्यातील त्यांचे रोमँटिक फोटो सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहेत.

विजय देवरकोंडा हा मुळचा तमिळनाडूचा आहे तर रश्मिका ही कर्नाटकातील कोडागू (कूर्ग) भागातील असून ती कोडावा हिंदू कुटुंबातील आहे. कोडावा समाज त्यांच्या अनोख्या परंपरा आणि शौर्यासाठी ओळखला जातो. त्यामुळे विजय आणि रश्मिकाचं हे रिसेप्शन पारंपरिक कोडवा शैलीत पार पडलं.

या खास प्रसंगी रश्मिकाने गुलाबी आणि ऑलिव्ह-ग्रीन रंगाची कोडवा स्टाईलमधील सिल्क साडी परिधान केली होती. टेम्पल ज्वेलरी आणि मिनिमल मेकअपने तिचा लूक अधिक उठून दिसत होता.

तर विजयने पांढरा शर्ट, काळी पॅन्ट आणि ब्लेझर असा साधा आणि एलिगंट लूक केला होता. दोघांचे हातात हात घालून चालतानाचे आणि पाहुण्यांशी संवाद साधतानाचे फोटो-व्हिडीओ व्हायरल होत असून चाहत्यांकडून त्यांच्या केमिस्ट्रीचं कौतुक केलं जात आहे.

या समारंभाची सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे एक मोठी भेट होती. मिळालेल्या माहितीनुसार, रश्मिकाच्या वडिलांनी आपल्या लाडक्या लेकीला लग्नाची भेट म्हणून कुर्गमध्ये एक आलिशान बंगला भेट म्हणून दिला आहे.

रिसेप्शनदरम्यान विजय देवरकोंडाने त्याच्या भावना व्यक्त केल्या. विजयने कर्नाटकातील महिलांचं कौतुक केलं. यावेळी त्याने त्याला कर्नाटक खूप आवडतं असं म्हटले आहे. "कूर्गी महिला खूप सुंदर आहेत, आणि मी त्यांच्यातीलच एका मुलीशी लग्न केलं आहे, याचा मला खूप आनंद आहे. तुम्हा सगळ्यांना इथे भेटून खूप छान वाटलं", असे त्यानं म्हटलं.

गीता गोविंदम' आणि 'डिअर कॉम्रेड' यांसारख्या चित्रपटांतून घराघरांत पोहोचलेली ही जोडी आता खऱ्या आयुष्यातही एकत्र आल्याने चाहते खूप आनंदी आहेत.