अभिनेता होण्यासाठी घरातून पळून आला होता यश; असा होता 'रॉकी भाई' प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 06:39 PM2024-01-08T18:39:57+5:302024-01-08T18:54:45+5:30

यशने त्याच्या करिअरमध्ये अभूतपूर्व यश मिळवले आहे.

'रॉकी भाई' ‘केजीएफ’ स्टार यशचा आज वाढदिवस आहे. 8 जानेवारी 1986 रोजी त्याचा जन्म झाला होता.

आज तो यशाच्या शिखरावर आहे. पण त्याचा प्रवास सोपा नव्हता. दमदार अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर त्याने आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

यशचे खरे नाव नवीन कुमार गौडा आहे. कर्नाटकातील एका छोट्या गावात वाढलेल्या या अभिनेत्याला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांची फार मोठी आहे.

यशचा जन्म कर्नाटकातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याचे वडील कर्नाटक सरकारी बस सेवेत ड्रायव्हर म्हणून काम करत होते.

यशला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. अभिनेता होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने आपले शिक्षण अर्धवट सोडले. घर सोडून तो बेंगळुरूला पोहोचला होता.

एका मुलाखतीमध्ये त्याने सांगितले होते की, 'हिरो बनण्यासाठी मी घरातून पळून बंगळुरूला आलो. खिशात फक्त 300 रुपये होते. जेव्हा घराकडे परत जाण्याचा विचार मनात आला, तेव्हा घरचे परत पाठवणार नाहीत हे जाणून होतो'.

यशने थिएटरमध्ये बॅकस्टेजवर काम करायला सुरुवात केली. यानंतर यशने 2008 मध्ये आलेल्या मोगिना मनासु या कन्नड चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. या चित्रपटासाठी त्याला 'सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता'हा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.

यानंतर तो 'राजधानी', 'गजकेसरी', 'मास्टरपीस' यांसारख्या चित्रपटांतून लोकप्रिय झाला. खिशात फक्त ३०० रुपये घेऊन निघालेला यश आज करोडोंच्या मालमत्तेचा मालक आहे. इतकेच नाही तर आज चित्रपट उद्योगात सर्वाधिक मानधन घेतलेल्या अभिनेत्यांपैकी एक आहे.

यशला खरी ओळख KGF चित्रपटातून (KGF) मिळाली. चाहते 'KGF 3' (KGF Chapter 3) चित्रपटाची वाट पाहत आहेत.

लव्ह लाईफबद्दल बोलायचं झालं तर त्याने अभिनेत्री राधिका पंडितसोबत लग्न केलंय. या जोडप्याला दोन मुले आहेत.