एका सुंदरीमुळे दुरावले दोन भाऊ... राम चरण आणि अल्लू अर्जून यांच्या घनिष्ट मैत्रीत पडली भेग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 18:22 IST2025-08-14T18:04:55+5:302025-08-14T18:22:04+5:30

कोण आहे ती अभिनेत्री?

अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रामचरण तेजा (Ram Charan Teja) हे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार्स आहेत. हे दोन्ही तगडे अभिनेते नात्याने भाऊदेखील आहेत.

अल्लू अरविंद हे अल्लू अर्जूनचे वडिल आहेत. तर चिरंजीवी हे राम चरणचे वडील आहेत. चिरंजीवी यांची पत्नी सुरेखा ही अल्लू अरविंद यांची बहिण आहे. म्हणजे अल्लू अर्जून हा राम चरणचा मामे भाऊ आहे.

अगदी लहानपणापासून अल्लू अर्जुन आणि रामचरण तेजा यांच्यात खूप घट्ट मैत्री होती. या दोन्ही भावांच्या नात्यात एका बॉलिवूड अभिनेत्रीमुळे दुरावा आला होता. हे दोन सुपरस्टार अनेक वर्ष एकमेकांशी बोललेदेखील नाहीत.

कुजबुज होती की, अल्लू अर्जुन एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. दोघांच्या नात्याची इंडस्ट्रीत बरीच चर्चा होती.

मात्र, नंतर या अभिनेत्रीच्या आयुष्यात रामचरण आला. परिणामी, अभिनेत्रीने अल्लू अर्जुनकडे पाठ फिरवून रामचरणसोबत जवळीक साधली. या कथित प्रेमत्रिकोणामुळे दोन्ही भावांमधील नात्यात तणाव आला.

ती अभिनेत्री होती नेहा शर्मा (Neha Sharma). नेहाने बॉलिवूडमध्ये येण्याआधी तेलुगू सिनेमांमध्येही काम केलं होतं.

असं म्हटलं जात की नेहासोबत अल्लू अर्जूनला लग्न करायचं होतं. पण, २००७ साली नेहाने 'चिरुथा'मध्ये रामचरणसोबत काम केलं होतं. या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान दोघे जवळ आले आणि त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं.

नेहा आणि राम चरण यांच्या अफेअरची चर्चा कानावर पडताच अल्लू अर्जूनला धक्का बसला. यानंतर अल्लू आणि रामचरण यांच्यात दुरावा आला.

दोघांमध्ये बोलणंही बंद झालं. रामचरणने मात्र नंतर कधीच नेहा शर्मासोबतच्या अफेअरवर स्पष्टीकरण दिलं नाही.

जरी आता दोघांमध्ये पूर्वीइतकी दुरावा नसला, तरी या जुन्या वादाचं गॉसिप आजही ऐकायला मिळतं.