ये लाल इश्क...! तमन्ना भाटियाचं मनमोहक फोटोशूट, चाहत्यांची नजर हटेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 17:27 IST2025-04-09T17:19:03+5:302025-04-09T17:27:46+5:30

अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या तिच्या 'ओडेला-२' चित्रपटामुळे चर्चेत आली आहे.

या नव्या सिनेमाच्या माध्यमातून लवरकरच ती चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. 'ओडेला २' हा सिनेमा २०२१ मध्ये आलेल्या 'ओडेला रेल्वे स्टेशन' या सिनेमाचा सीक्वेल आहे.

हा चित्रपट १७ एप्रिल रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तमन्ना भाटिया तिच्या चित्रपटांसह फोटोशूटमुळे कायम चर्चेत येत असते.

दरम्यान, नुकतंच तिने 'ओडेला-२' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी केलेल्या लुकने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

लाल रंगाचा अनारकली ड्रेस आणि केसात गुलाब माळून तिने खास फोटोशूट केलं आहे.

तमन्ना या फोटोंमध्ये अतिशय सुंदर दिसतेय. तिच्या या लूकवरून नजर हटत नाही.

"द कलर ऑफ शक्ती...", असं कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोंना दिलं आहे.

अभिनेत्रीचं हे फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे.