स्मृती मानधनाच्या मित्राने फसवणुकीचे आरोप लावले, आता पलाश मुच्छलने घेतला मोठा निर्णय; सोशल मीडियावरुन फोटो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 17:11 IST2026-01-25T16:50:48+5:302026-01-25T17:11:03+5:30

पलाश मुच्छल पुन्हा एकदा ट्रोलिंगचा सामना करत आहे. क्रिकेटपटू स्मृती मानधनाचा मित्र आणि अभिनेता विज्ञान माने याने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांदरम्यान, पलाशने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून स्मृतीसोबतचे फोटो काढून टाकले आहेत.

भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि गायक-दिग्दर्शक पलाश मुच्छल यांचे लग्न रद्द होऊन दोन महिने उलटले. पण तरीही, त्या दोघांची अजूनही चर्चा सुरूच आहेत. दोन दिवसापूर्वी स्मृती मानधनाचा मित्र अभिनेता विज्ञान माने याने पलाशवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

विज्ञान माने याने पलाश मुच्छल याच्याविरुद्ध ४० लाख रुपयांचा फसवणुकीचा खटला दाखल केला. पलाशने स्मृती मानधनाची फसवणूक केली असल्याचा दावाही माने यांनी एका मुलाखतीमध्ये केला.

तो एका महिलेसोबत बेडवर पकडला होता, त्यानंतर स्मृतीच्या महिला क्रिकेटपटू मैत्रिणींनी त्याला मारहाण केली. माने यांच्या दाव्यांमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली.

स्मृतीशी ब्रेकअप झाल्यानंतर दोन महिन्यांनी, पलाशने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचे सर्व फोटो काढून टाकले आहेत. पलाशने स्मृतीसोबतचा त्याचे सर्व फोटो डिलीट केले. ते फोटो त्याने आधीच काढले नव्हते. फसवणुकीचा आरोप झाल्यानंतर पलाशने हे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे.

इंस्टाग्राम अकाउंटवर पलाश आणि स्मृतीचे अनेक फोटो शेअर केले होते. यामध्ये त्याचा आणि स्मृतीचा महिला क्रिकेट विश्वचषक विजय साजरा करतानाचा एक फोटो होता.

विश्वचषक संपल्यानंतर काही दिवसांनी, २३ नोव्हेंबर रोजी हे जोडपे लग्न करणार होते. पण अचानक लग्न रद्द करण्यात आले. पलाशने स्मृतीची फसवणूक केल्यामुळे लग्न रद्द करण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

दोघांपैकी कोणीही या वृत्तांना दुजोरा दिला नाही. पलाश आणि स्मृतीने ८ डिसेंबर रोजी लग्न रद्द झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. दरम्यान, आता पलाशने आचे म्हटले आहे.