'शार्क टँक'मधून रिकाम्या हाती परतला; पण ४८ तासांत जे घडलं ज्यानं भविष्यच बदललं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 19:32 IST2023-01-13T19:29:49+5:302023-01-13T19:32:38+5:30

'शार्क टँक इंडिया'चा दुसरा सीझन सुरू झाला असून तो प्रेक्षकांची मनेही जिंकत आहे. बिझनेस बेस्ड रिअॅलिटी शोचा भाग झाल्यापासून अनेक लोकांचे आयुष्य बदलले आहे. शोमध्ये येणाऱ्या प्रत्येक स्पर्धकामध्ये काहीतरी खास पाहायला मिळते आणि त्यामुळेच शार्क देखील त्यांच्याकडून प्रभावित होतात.
त्याचवेळी, शोमध्ये आलेले उद्योजक गणेश बालकृष्णन यांची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. गणेश बालकृष्णन यांनी आपल्या संघर्ष कथेने केवळ शार्कमधील जजेसची मने जिंकली नाहीत तर लोकांची पसंतही त्यांना मिळाली.
गणेश बालकृष्णन यांना 'शार्क टँक २' मध्ये शार्ककडून गुंतवणूक मिळवण्यात अपयश आले. परंतु त्यांनी आपल्या जीवनकथेने लोकांच्या हृदयाला स्पर्श केले. आयआयटी आणि आयआयएमचे विद्यार्थी बालकृष्णन यांचा फ्लॅटहेड्स शूजचा व्यवसाय आहे
बालकृष्णन यांनी सांगितले की, २०१९ मध्ये सुरू झालेली त्यांची कंपनी फ्लॅटहेड्स शूज बंद होण्याच्या मार्गावर आहे. व्यवसाय चांगला चालू शकला असता, परंतु कोरोना महामारीनं भारतात शिरकाव केला आणि त्यानंतर सर्व काही उद्ध्वस्त झाले.
गणेश बालकृष्णन यांनी आपला व्यवसाय वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि दोन महिन्यांत ३५ लाख रुपयांची गुंतवणूक केली. पण तरीही काहीच मदत मिळाली नाही. अशा परिस्थितीत ते शार्क टँकमध्ये फंड मिळविण्यासाठी आले होते, मात्र तसे होऊ शकले नाही.
गणेश बालकृष्णन यांना नोकरीची ऑफर मिळाली परंतु डील मिळाली नाही. त्यामुळे ते शार्क टँकमधून रिकाम्या हाताने परतले. हा एपिसोड प्रसारित झाल्यानंतर ४८ तासांतच त्यांनी कल्पनाही केली नसेल असं काही घडलं.
शार्क टँक इंडियातील शार्क अनुपम मित्तल यांनी गणेश बालकृष्णन यांना नोकरीची ऑफर दिली होती, परंतु त्यांनी ती नाकारली. याशिवाय पियुष बन्सल आणि विनिता सिंह यांनी 33.3% इक्विटीसाठी ७५ लाख देण्याविषयी बोलले होते, परंतु बालकृष्णन यांनी हे देखील मान्य केले नाही.
अशा परिस्थितीत ते कोणताही डील न करता शोमधून रिकाम्या हाताने परतले. मात्र, त्यांना लोकांचा पाठिंबा मिळू लागला आणि बंद पडण्याच्या मार्गावर असलेली त्यांची कंपनी पुन्हा एकदा नव्याने उड्डाण घेण्यासाठी सज्ज झाली.
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिले की, “भारतातील आमचं उत्पादन जवळपास विकले गेले आहे त्यामुळे साईटवर तुमची साईज सापडत नाही तर आम्ही दिलगीर आहोत. तुम्ही तुमच्या US आणि UAE मधील मित्रांना आमचे शूज वापरून पाहण्यास सांगू शकल्यास ते चांगले होईल. त्यामुळे बालकृष्णन यांच्यावरील कर्जाचं संकट दूर झालं आहे.