शरद केळकरची पत्नी आली चर्चेत, किर्ती केळकरच्या फोटोने वेधले लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 13:01 IST2021-08-19T12:49:31+5:302021-08-19T13:01:02+5:30
अभिनेता शरद केळकर हा चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावंत आणि हरहुन्नरी कलाकार आहे. एक उत्तम कलाकार असलेला शरद एक प्रेमळ पिताही आहे. किर्ती आणि शरदने ‘सात फेरे’ या मालिकेत एकत्र काम केले होते. याच मालिकेच्या सेटवर दोघांमध्ये प्रेम बहरले. यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.२००५ साली शरद आणि किर्ती केळकर रेशीमगाठीत अडकले.

किर्ती केळकरही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने विविध हिंदी मालिकेत काम करत आपली छाप सोडली आहे.
किर्ती आणि शरद दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात.
कुटुंबासोबत मजा मस्ती करतानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात.
आता शरद केळकरची पत्नी किर्ती सध्या चर्चेत आहे. चर्चेत येण्यास कारणीभूत ठरला आहे तिचा हा खास फोटो.
किर्तीने तिचा हा सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सोनेरी रंगाचा शिमर लेहंगा तिने परिधान केला असून साजेशी अशी ज्वेलरीमुळे तिच्या सौंदर्याला चारचाँद लागले आहेत.
किर्ती सोशल मीडियावर तिचे एकसे बढकर एक फोटो शेअर करत असते.
नेहमीच हटके स्टाइल आणि ग्लॅमरस लुक चाहत्यांना भावतो. ग्लॅमरस फोटोशूटद्वारे किर्तीचा ग्लॅमरस लुक चाहत्यांना पुन्हा पाहायला मिळाला.
विना मेकअपही ती खूप सुंदर दिसते. सोशल मीडियावर तिचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.
सध्या तिचा हा ग्लॅमरस फोटो पाहून चाहत्यांच्या कमेंटवर कमेंट पाहायला मिळत असून सारेच तिच्या सौंदर्याचे कौतुक करताना दिसत आहे.
किर्ती आजही हटके स्टाइल स्टेटमेंट कॅरी करते. तिचा फॅशन सेन्स अप्रतिम आहे.