Pics : लग्न मैत्रिणीचे, थाट शाहिदच्या बायकोचा...! नवरी एकीकडे अन् मीराचीच चर्चा रंगली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 17:43 IST2021-02-17T17:30:18+5:302021-02-17T17:43:37+5:30
तिचे स्टाईल स्टेटमेंट, फॅशन आणि लग्नातले धम्माल मस्तीचे फोटो व्हायरल झाले नसतील तर नवल.

जीवलग मैत्रिणीच्या लग्नात कोण धम्माल करणार नाही? मीरा राजपूतनेही अशीच धम्माल केली.
होय, मीराची बेस्ट फ्रेन्ड सेजलचे नुकतेच लग्न झाले. या लग्नात सेजल राहिली एकीकडे अन् मीराचीच चर्चा रंगली.
शाहिद कपूर सारख्या स्टारची बायको म्हणून मीरा या लग्नात भाव खाऊन गेली.
तिचे स्टाईल स्टेटमेंट, फॅशन आणि लग्नातले धम्माल मस्तीचे फोटो मग व्हायरल झाले नसतील तर नवल.
मीराने हळदीत नाचली, संगीत सेरेमनीत थिरकली. एकंदर काय तर सगळीकडे मीरा आणि मीराच दिसली.
मीराने या लग्नाचे काही फोटो स्वत:च्या अकाऊंटवर शेअर केले आहेत. या लग्नाचे काही व्हिडीओही व्हायरल झाले आहेत.
मीरा राजपूतची फॅन फॉलोइंग सारखी वाढतेय, त्याचे हेच कारण आहे.
काही दिवसांपूर्वी मीराने स्वत:चे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले होते. तेही तुफान व्हायरल झाले होते.