Sara Tendulkar Instagram Story: 'आज फैसला होऊनच जाऊ दे...' ; सारा तेंडुलकरच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 19:06 IST2022-07-09T18:38:30+5:302022-07-09T19:06:42+5:30
सारा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते पण आजचं कारण खूपच वेगळं आहे

Sara Tendulkar Instagram Story: भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची कन्या सारा तेंडुलकर विविध गोष्टींमुळे चर्चेत असते. सारा आपल्या ग्लॅमसर लूक आणि बोल्ड-बिनधास्त फोटोंमुळे चर्चेचा विषय ठरते.
सारा तेंडुलकर फिटनेसबाबत अतिशय सजग असल्याने मध्यंतरी तिचे जिम सेशनमधील फोटोदेखील चांगलेच व्हायरल झाले होते आणि चाहत्यांच्या पसंतीस आले होते.
सध्या मात्र साराची एक इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत आहे. या इन्स्टा स्टोरी मध्ये साराने 'आज काय तो फैसला होऊन जाऊ दे' असं लिहिलं आहे. पाहूया नक्की काय आहे हा प्रकार...
यंदाच्या IPL मध्ये साराने आपला भाऊ अर्जुनचा खेळ पाहण्यासाठी हजेरी लावली होती, पण अर्जुनला खेळण्याची संधी मिळाली नाही.
त्यानंतर आता साराने अर्जुनबरोबरचा एक फोटो पोस्ट करत आज काय तो फैसला करूनच टाकूया.. या आशयाचा मेसेज लिहिला आहे.
अर्जुन आणि सारा एकत्र बसले असून फोटोत त्यांचा क्लोज-अप शॉट आहे. त्याबद्दल लिहिताना साराने म्हटले आहे की, 'आम्ही दोघे सारखेच दिसतो का?' त्याखाली साराने हो किंवा नाही असे पर्याय दिले असून.. आज फैसल करून टाकूया असे लिहीले आहे.