PHOTOS : सारा अली खानचे सुंदर घर...; फोटोंमधून पाहा एक झलक!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 16:49 IST2021-02-11T16:35:07+5:302021-02-11T16:49:36+5:30
साराच्या वागण्यात नवाबी थाट नसला तरी तिच्या घरात याची हलकी झलक पाहायला मिळते.

अमृता सिंग आणि सैफ अली खानची मुलगी एवढीच फक्त सारा अली खानची ओळख राहिलेली नाही. आज सारा बॉलिवूडचा एक लोकप्रिय चेहरा आहे. पण आज आम्ही साराच्या घराची एक झलक दाखवणार आहेत.
सारा तिच्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. याच अंदाजामुळे, स्वभावामुळे ती फार कमी वेळात लोकप्रिय झालीये. म्हणायला सारा नवाब सैफ अली खानची मुलगी आहे. पण सारा अतिशय डाऊन टू अर्थ हिरोईन आहे, हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे.
सारा तिच्या आई व भावासोबत राहते. तिचे घर आतून अतिशय सुंदर सजवले आहे.
साराची खोली आणि फर्निचर सगळे काही युनिकॉर्न थीमवर डिझाईन केलेले आहे. तिच्या खोलीतील सोफ्यावर सॉफ्ट टॉईज सजवलेले तुम्ही पाहू शकता.
नवाबी थाट वागण्यात नसला तरी घरात याची हलकी झलक पाहायला मिळते.
घरातील फर्निचर युनिक आहे. मोठमोठ्या सुंदर झुबरांनी घर सजवण्यात आले आहे.
या सुंदर घरात साराने अलीकडे एक फोटोशूट केले होते.
साराची आई अमृता हिंदू आहे तर वडील मुस्लिम. सारा दोन्ही धर्म मानते. साराच्या घरी सुंदर मंदिर आहे. येथे सारा अनेकदा आईसोबत पूजापाठ करते.
साराने तिच्या करिअरची सुरुवात ‘केदारनाथ’ या सिनेमापासून केली होती.
यानंतर ‘सिम्बा’, ‘लव्ह आज कल’, ‘कुली नंबर 1’ अशा अनेक चित्रपटात ती दिसली.