Rapper Saniya Mistry : हिजाब, हातात माईक अन् रॅप, मुंबईची Gully Girl सानिया मिस्त्रीची प्रेरणादायी कहाणी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 15:52 IST2023-02-01T15:35:49+5:302023-02-01T15:52:13+5:30
'मेरे गली मे गली गली गली मे', मुंबईच्या या Gully girl ने तिच्या रॅप गाण्यांनी मन जिंकले आहे.

मुंबईतील गोवंडीतल्या छोट्याशा घरातून आलेली १६ वर्षीय सानिया मिस्त्री आज सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. सानिया उत्तम रॅपर आहे.
११ वी मध्ये असणारी सानिया गोवंडीतल्या शिवाजीनगर भागात झोपडपट्टी वस्तीत राहते. तिचे वडील रिक्षाचालक आहेत. तर आई घरकाम करते.
समाजात सामोरे जावे लागणाऱ्या गोष्टींवर सानिया रॅप करते. तिला आणइ तिच्या आजुबाजुच्यांना नेहमीच गरिबीमुळे भेदभावाला सामोरे जावे लागले आहे. तु आयुष्यात काहीच करु शकत नाही असे टोमणे तिला ऐकावे लागले आहेत.
इतक्या लहान वयात सानियाकडे असलेला शब्दसाठा पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल. सानिया आता मुंबईची Gully Girl म्हणून लोकप्रिय होत आहे.
saniya_mq नावाने तिचे युट्युब आणि इन्स्टाग्रामवर अकाऊंट आहे. तिच्या 'सच' या अल्बम ला १२ हजार पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. ् तर युट्युबवर तिचे ११ हजार फॉलोअर्स आहेत.
सानियाला ८ व्या वर्षापासूनच कविता लिहायची आवड आहे. हळूहळू तिला रॅप विषयी समजले आणि तिने रॅप करायला सुरुवात केली .
सानियाचे व्हिडिओ लोकप्रिय झाल्यानंतर तिला टोमणे मारणे बंद झाले. यासाठी तिला आईचा पाठिंबा मिळाला.
सानियाच्या घरची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. रॅप कसं करतात हे बघण्यासाठी तिच्याकडे मोबाईल देखील नव्हता.
आता सानियाचं रॅप लोक ऐकू लागले आहेत. तिची लोकप्रियता वाढत चालली आहे. लवकरच मुंबईच्या या gully girl चा आवाज देशभरात पोहचेल अशी आशा आहे.