'सनम तेरी कसम'मधील सरू आठवतेय का? पाहा लग्नाच्या फोटोचा अल्बम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 18:47 IST2025-02-06T18:35:36+5:302025-02-06T18:47:19+5:30
पाहा, 'सनम तेरी कसम'मधीलल सरू अर्थात अभिनेत्री मावरा होकेनच्या शाही लग्नाचे फोटो आणि काही रोमॅन्टिक क्षण

२०१६ साली आलेला रोमँटिक हिंदी सिनेमा 'सनम तेरी कसम' (Sanam Teri Kasam) आजही चाहत्यांच्या मनात घर करुन आहे. या सिनेमातील सरू अर्थात अभिनेत्री मावरा होकेन लग्नबंधनात अडकली आहे.
मावरा होकेनने लग्न (Mawra Hocane Wedding) करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलाय. मावराने पाकिस्तानी अभिनेता अमीर गिलानीसोबत ५ फेब्रुवारी २०२५ रोजी लग्न केलंय.
अभिनेत्री मावरा होकेनच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
मावरा आणि अमीर गिलानी यांनी रोमँटिक फोटोशूट केलं आहे.
मावराने लग्नासाठी खास पाकिस्तानी पेहराव केला. यात ती अतिशय सुंदर दिसत होती.
तर तिचा पती अमीर गिलानीने शेरवानी घातली आहे. दोघांचाही लूक चर्चेत आहे.
चाहत्यांकडून तिच्यावर तिच्यावर शुभेच्छा वर्षाव होत आहे.
मावरा आणि अमीरच्या अफेअरची चर्चा रंगली होती. अखेर दोघांनी लगन करत नव्या आयुष्याची सुरुवात केली.
'सबात' आणि 'नीम' यांसारख्या मालिकांमध्ये मावरा आणि अमीरने एकत्र काम केलं होतं
दरम्यान, सनम तेरी कसम' हिंदी सिनेमाच्या इतिहासात सर्वात लोकप्रिय अशी लव्हस्टोरी आहे. सिनेमाने बॉक्सऑफिसवर चांगला बिझनेस केला.
सिनेमातील गाणीही आजही लोकांच्या ओठांवर आहेत. आता निर्माते आणि मेकर्सने ८ वर्षांनी सिनेमाचा सीक्वेल येत असल्याची गुडन्यूज दिली. अर्थात 'सनम तेरी कसम २'चं सध्या काम सुरु आहे.