PHOTOS: सना खानने बॉलिवूडला अलविदा केल्यानंतर शेअर केला व्हिडीओ, पहा तिचे व्हायरल फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2020 14:16 IST2020-10-15T14:16:11+5:302020-10-15T14:16:11+5:30

बिग बॉस फेम अभिनेत्री सना खानने चाहत्यांमध्ये एक वेगळी ओळख बनवली आहे.
सना खानने बिग बॉस व्यतिरिक्त चित्रपटातही काम केले आहे.
मात्र नुकतेच सना खानने बॉलिवूडला अलविदा केल्याचे जाहीर केले. सनाने सोशल मीडियावर पोस्ट करत एका मेसेजमध्ये आपल्या धर्मासाठी बॉलिवूड सोडत असल्याचे सांगितले.
यासोबतच सना खानने आपल्या इंस्टाग्रामवरील सर्व जुन्या पोस्ट डिलीट केल्या आहेत. नुकतेच सनाने एक पोस्ट शेअर केली होती. त्यावरून युजरने ट्रोल केले होते.
बॉलिवूडला रामराम केल्यानंतर मंगळवारी सना खानने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत ती इस्लामबद्दल बोलत होती.
व्हिडीओत सनाने हलका मेकअप केला होता आणि प्रिंटेड ओढणीमध्ये ती दिसली. सनाचा हा लूक युजर्सना भावला नाही.
बॉलिवूड सोडल्यानंतर काही लोकांनी सना खानचे कौतूक केले तर काहींनी तिला ट्रोल केले.