थाटामाटात पार पडला सखी गोखले व सुव्रत जोशीचा लग्न सोहळा!!!, पहा या सोहळ्याचे Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 16:32 IST2019-04-11T16:23:43+5:302019-04-11T16:32:29+5:30

मराठी चित्रपटसृष्टीतील 'दुनियादारी' मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता सुव्रत जोशी व अभिनेत्री सखी गोखले नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सुव्रत जोशी व सखी गोखले यांच्या लग्नांच्या चर्चेला उधाण आले होते. मात्र आता नुकताच त्यांचा फोटो समोर आला आहे. ज्यात ते दोघे विवाहबंधनात अडकले असल्याचे समजते आहे.
सखी गोखले हिरव्या रंगाच्या साडीत वधूच्या गेटअपमध्ये खूपच सुंदर दिसते आहे.
या विवाह सोहळ्याला मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी हजेरी लावली आहे.
मेहंदी सेरेमनीदेखील बुधवारी पार पडली.
सखी गोखलेची मेहंदी सेरेमनी बुधवारी पार पडली व त्यानंतर त्यांची सेलिब्रेशन पार्टी देखील पार पडली. यावेळी डान्स करतानाचा त्या दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
काही दिवसांपूर्वी सखीने सोशल मीडियावर स्पिनस्टर्स पार्टीचे फोटो शेअर केले होते.त्यात तिने वेस्टर्न आऊटफिटवर बॅचरल लिहिलेले रिबेन तिने परिधान केले होते.
तिच्या स्पिनस्टर्स पार्टीच्या फोटोवर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.
तसेच सुव्रत जोशीने देखील केळवणचा फोटो शेअर केला होता.
सुव्रत आणि सखी गोखले यांनी 'दुनियादारी' मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या मालिकेतील त्यांच्या कामाचे खूप कौतूक झाले.