"मैं तेरी परछाई हूँ", आई शुभांगीबरोबर सखीचं फोटोशूट; पाहा मायलेकींचे खास फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 12:07 IST2024-05-14T11:57:27+5:302024-05-14T12:07:03+5:30
सखी गोखले आणि शुभांगी गोखले यांचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.

शुभांगी गोखले आणि सखी गोखले ही मराठी सिनेसृष्टीतील मायलेकीची लोकप्रिय जोडी आहे. सखी ही शुभांगी गोखले आणि दिवंगत अभिनेता मोहन गोखले यांची मुलगी आहे.
आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सखीने अभिनयाची वाट धरली. 'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या सखीने सिनेमांमध्येही काम केलं आहे.
नुकतंच या मायलेकीने फोटोशूट केलं आहे. यामध्ये शुभांगी गोखले आणि सखीने साडी नेसून दमदार लूक केला आहे.
शुभांगी गोखले यांनी लाल रंगाच्या साडीत नेसली आहे.
अगदी साधा मेकअप आणि सिल्व्हर ज्वेलरीमध्ये त्यांचं सौंदर्य खुलून आलेलं दिसत आहे.
तर सखीने मस्टर्ड कलरची साडी नेसून केस मोकळे सोडत अत्यंत साधा लूक केला आहे.
फोटोशूटसाठी मायलेकींनी खास पोझही दिल्या आहेत.
सखी गोखले आणि शुभांगी गोखले यांचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.
या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.