Photos: 'बिबट्या' स्टाइलमध्ये बोल्ड दिसतेय सई ताम्हणकर, मादक अदा पाहून चाहते घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 12:58 IST2026-03-28T12:26:32+5:302026-03-28T12:58:35+5:30

सईने साडीमध्ये एक खास फोटोशूट केलं आहे. तिच्या या फोटोंनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

बोल्ड बिनधास्त आणि ब्युटिफूल सई ताम्हणकर कायमच तिच्या फॅशनमुळे चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं. सईचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असते.

नुकतंच सईने साडीमध्ये एक खास फोटोशूट केलं आहे. तिच्या या फोटोंनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

या फोटोंमध्ये सईने बिबट्या स्टाइल केल्याचं दिसत आहे. बिबट्या प्रिंट असलेली साडी तिने नेसली आहे.

फोटोसाठी सईने खास पोझ दिल्या आहेत. ज्यामध्ये तिच्या मादक अदा पाहायला मिळत आहेत.

या फोटोला सईने मजेशीर कॅप्शनही दिलं आहे. "If ‘बिबट्या’ was a person", असं कॅप्शन तिने फोटोंना दिलं आहे.

सईची बिबट्या फॅशन चाहत्यांना आवडली आहे. तिच्या बोल्ड लूकवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

केस मोकळे सोडल्याने सईचं सौंदर्य आणखीनच उठून आल्याचं दिसत आहे.