रिचा चड्डाच्या ‘मॅडम चीफ मिनिस्टर’ या चित्रपटाचा पोस्टर तुम्ही पाहिला का? पोस्टर आहे खूपच हटके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 13:17 IST2021-01-05T13:17:48+5:302021-01-05T13:17:48+5:30

रिचा चड्डाची मुख्य भूमिका असलेला ‘मॅडम चीफ मिनिस्टर’ २२ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.
भारतातील चित्रपटगृहं आता सुरू झाली असून प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या कलाकांचे चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहेत.
मॅडम चीफ मिनिस्टरचे पहिले पोस्टरने टी-सीरिजने सोशल मीडियावर शेअर केले आहे.
या चित्रपटात रिचा चड्डा, मानव कौल आणि सौरभ शुक्ला यांच्या मुख्य भूमिका आहेत.
पोस्टरमध्ये रिचाच्या हातात झाडू दिसत असून तिच्यासोबत मानव आणि सौरभ उभे आहेत. (सभी फोटो इंस्टाग्राम)
रिचाच्या फॅन्सना तिचे हे पोस्टर प्रचंड आवडले आहे.
‘जॉली एलएलबी’ फेम सुभाष कपूर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून या चित्रपटाची पटकथा देखील त्यांची आहे.
‘मॅडम चीफ मिनिस्टर’ हा एक राजकीय ड्रामा असून याचा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.