६ मुलांच्या वडिलांच्या प्रेमात पडलेली रेखाची आई; अभिनेत्यासोबत होते संबंध, त्याने पत्नीला सोडायला नकार दिला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 17:21 IST2025-02-27T17:03:51+5:302025-02-27T17:21:03+5:30
खऱ्या प्रेमाची किंमत मायलेकींनी मोजली, ६ मुलांचे वडील असलेल्या अभिनेत्याच्या प्रेमात पडलेली रेखाची आई

बॉलिवूड अभिनेत्री रेखाला कोण ओळखत नाही. वयाची सत्तरी ओलांडलेली रेखा आजही चाहत्यांना तिच्या सौंदर्याने घायाळ करते.
प्रेक्षकांचं अतोनात प्रेम मिळालेल्या रेखाला खऱ्या आयुष्यात मात्र तिच्या प्रेमाला मुकावं लागलं. लग्नानंतर काही महिन्यातच पतीचं निधन झाल्यानंतर रेखाने सिंगल राहणंच पसंत केलं.
रेखाप्रमाणेच तिच्या आईलाही खऱ्या आयुष्यात प्रेम मिळालं नाही. रेखाची आईदेखील सुप्रसिद्ध अभिनेत्री होती. त्यांचं नाव पुष्पावली असं होतं.
पुष्पावली यांनी त्यांच्या अभिनयाने ३०-४० चं दशक गाजवलं. त्यांनी बालकलाकार म्हणूनच काम करायला सुरुवात केली होती. १९४७ साली प्रदर्शित झालेल्या मिस मालिनी या सिनेमाने त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली.
पुष्पावली यांनी १९४० साली आय वी रंगचारी यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र, ६ वर्षांतच त्यांचा संसार मोडला. त्यांच्यापासून त्यांना दोन मुलं होती.
सिनेमात काम करणं पुष्पावल्ली यांच्या सासरच्या लोकांना आणि पतीलाही मान्य नव्हतं. त्यामुळेच ते दोघेही वेगळे राहू लागले होते.
त्यानंतर पुष्पावल्ली एका सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अभिनेता जेमिनी गणेशन यांच्या प्रेमात पडल्या. जेमिनी यांची आधीच दोन लग्न झाली होती. तेव्हा त्यांना ६ मुलं होती.
पुष्पावल्ली यांनी पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला नव्हता. पण, जेमिनी यांच्यासोबत त्यांचे प्रेमसंबंध होते. यातूनच अभिनेत्री रेखाचा जन्म झाला होता.
पुष्पावल्ली यांना रेखानंतर अजून एक मुलगी झाली. त्यानंतर त्यांनी गणेशन यांना लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली.
मात्र अभिनेत्याने पत्नीला सोडण्यास नकार दिला. जेमिनी यांनी ७८व्या वर्षी गुपचूप तिसरं लग्न केलं. यामुळे पुष्पावल्ली यांना धक्का बसला होता. आणि त्यांनी जेमिनी यांच्यासोबत असलेले सगळे संबंध तोडले.
पुष्पावल्ली या लहानपणापासूनच त्यांच्या दोन्ही मुलींना सेटवर घेऊन जात होत्या. पण, त्यांना फार चांगली कामं मिळत नव्हती. त्यामुळेच नंतर रेखा यांना कमी वयातच सिनेमात काम करावं लागलं.