दीपवीरचा रॉयल लूक; बंगळुरुत ग्रॅण्ड रिसेप्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 22:57 IST2018-11-21T22:50:41+5:302018-11-21T22:57:53+5:30

इटलीच्या लेक कोमोमध्ये विवाह बंधनात अडकल्यावर आज दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगनं बंगळुरुत रिसेप्शन दिलं. यावेळी दोघेही रॉयल लूकमध्ये दिसत होते.

बंगळुरुच्या द लीला पॅलेस हॉटेलमध्ये रणदीपनं नातेवाईक आणि मित्र परिवाराला रिसेप्शन दिलं.

या सोहळ्सासाठी दीपिका सोनेरी रंगाची साडी, तर रणवीरनं शेरवानी परिधान केली होती.

नवदाम्पत्यानं रिसेप्शनआधी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींसमोर फोटोसाठी खास पोझ दिल्या. दीपिकाच्या आई-बाबांनी या ग्रॅण्ड रिसेप्शनचं आयोजन केलं आहे.

दीपिका आणि रणवीरमधली परफेक्ट केमिस्ट्री रिसेप्शनवेळी पाहायला मिळाली. दीपिकाला साडी सावरायला यावेळी रणवीरनं मदत केली. हा क्षण उपस्थितांनी कॅमेऱ्यात टिपला.

रणवीर आणि दीपिका 14 आणि 15 नोव्हेंबरला लेक कोमोमध्ये विवाह बंधनात अडकले.

रणदीप रिसेप्शननंतर उद्या मुंबईला परतणार आहेत. 28 नोव्हेंबरला मुंबईत दुसरं रिसेप्शन आयोजित करण्यात आलं आहे.