डिलिव्हरीनंतर राजपाल यादवच्या पहिल्या पत्नीचं निधन; मग कॅनडातल्या राधासोबत थाटला संसार, कोण आहे दुसरी पत्नी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 13:18 IST2026-02-12T13:13:58+5:302026-02-12T13:18:45+5:30

पहिल्या पत्नीच्या निधनानंतर राजपाल अभिनयात आला होता. राजपालचं अवघ्या २०व्या वर्षी करुणा यांच्याशी लग्न झालं होतं. पण मुलीला जन्म देताना त्याच्या पत्नीचं निधन झालं.

बॉलिवूडचा कॉमेडी अभिनेता राजपाल यादव आर्थिक संकटात सापडला आहे. ९ कोटींचा चेक बाऊन्स प्रकरणी राजपाल यादवने तिहार जेलमध्ये सरेंडर केलं. त्यानंतर बॉलिवूड इंडस्ट्री त्याला मदत करण्यासाठी पुढे सरसावली.

राजपाल यादवला त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक गोष्टींचा सामना करावा लागला आहे. मध्यमवर्गातून आलेल्या राजपाल यादवने बॉलिवूडमध्ये नाव कमावलं.

पहिल्या पत्नीच्या निधनानंतर राजपाल अभिनयात आला होता. राजपालचं अवघ्या २०व्या वर्षी करुणा यांच्याशी लग्न झालं होतं. पण मुलीला जन्म देताना त्याच्या पत्नीचं निधन झालं.

डिलिव्हरीनंतर दुसऱ्या दिवशी राजपाल त्याच्या पत्नीला भेटणार होता. मात्र त्याआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला.

पत्नीच्या निधनानंतर राजपालने अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला. १९९१ मध्ये त्याने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून करिअरला सुरुवात केली.

जवळपास ८ वर्षांनी त्याला जंगल सिनेमातून पहिला ब्रेक मिळाला. जो त्याच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला.

२००१ साली द हिरो सिनेमाचं शूटिंग करताना राजपालची भेट राधाशी झाली.

त्यांच्यातील मैत्री हळूहळू वाढू लागली. या मैत्रीचं रुपांतर नंतर प्रेमात झालं.

दोन्ही कुटुंबीयांच्या संमतीने राजपाल यादव आणि राधाने २००३ मध्ये लग्न केलं. राधा ही मुळची कॅनडाची आहे.

राधाने राजपालच्या पहिल्या पत्नीच्या मुलीलाही आपलंसं केलं आणि तिचा सांभाळ केला. आताही राजपालच्या या कठीण काळात ती त्याच्यासोबत खंबीर उभी आहे.