Bhagwant Mann weds Gurpreet Kaur Photos: शुभमंगल सावधान! पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान अन् गुरप्रीत यांचा विवाहसोहळा; अरविंद केजरीवाल बनले वधूपिता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2022 12:59 PM2022-07-07T12:59:32+5:302022-07-07T13:11:00+5:30

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा हा दुसरा विवाह आहे.

Bhagwant Mann weds Gurpreet Kaur पंजाबचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते भगवंत मान आज दुसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकले. दुपारी १२च्या सुमारास मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत त्यांचा विवाह सोहळा पार पडला.

मुख्यमंत्री पदाची माळ गळ्यात पडल्यानंतर एका अत्यंत खासगी कार्यक्रमात त्यांच्या गळ्यात आज दुसऱ्यांदा लग्नाची माळ पडली.

भगवंत मान-गुरप्रीत कौर यांच्या लग्नसोहळ्याला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेदेखील उपस्थित होते. अरविंद केजरीवाल यांनी वधूपिता बनून सर्व धार्मिक विधी पार पाडले.

चंदीगढमध्ये डॉ. गुरप्रीत कौर यांच्याशी भगवंत मान यांचा विवाह संपन्न झाला. यावेळी वधू गुरप्रीत यांनी अतिशय सुंदर व नक्षीदार लाल रंगाचे वधूवस्त्र परिधान केले होते.

भगवंत मान हे ४८ वर्षांचे आहेत. त्यांचे हे दुसरे लग्न आहे. पहिली पत्नी इंदरप्रीत कौर हिच्याशी त्यांचा घटस्फोट झालेला आहे. त्यांची दोन मुले इंदरप्रीत यांच्यासोबत अमेरिकेत असतात.

कॉमेडियन म्हणून प्रसिद्धीझोतात आलेले भगवंत मान, २०२२ मध्ये आम आदमी पक्षाकडून पंजाबचे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या नेतृत्वात पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले.

डॉ. गुरप्रीत कौर या मान कुटुंबाच्या अगदी जवळच्या आहेत. भगवंत मान आणि गुरप्रीत कौर यांची बरेच महिन्यांपासूनची ओळख असून मान कुटुंबाचीही गुरप्रीतला पसंती असल्याने हे लग्न निर्विघ्नपणे पार पडले.

भगवंत मान यांच्या लग्नसोहळ्याला फार मोठा खर्च टाळ्यात आला. चंदीगढच्या एका गुरूद्वारामध्ये हे लग्न झाले.

भगवंत मान आणि डॉ. गुरप्रीत कौर यांच्या लग्नाचे फोटो काही तासांतच सोशल मीडियावर व्हायरल झाले.