'पुन्हा शिवाजीराजे भोसले' बॉक्स ऑफिसवर भगवा फडकवणार? ५ दिवसांत कमावले 'इतके' कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 15:54 IST2025-11-05T15:45:08+5:302025-11-05T15:54:12+5:30

'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. आत्तापर्यंत सिनेमाने बॉक्स ऑफिसवर किती कोटींची कमाई केली ते जाणून घेऊया.

या सिनेमाला प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहात गर्दी करत आहेत.

बहुप्रतिक्षित 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा अखेर ३१ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. महेश मांजरेकरांचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमातून शेतकरी आत्महत्यासारख्या गंभीर विषयावर भाष्य करण्यात आलं आहे.

'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. आत्तापर्यंत सिनेमाने बॉक्स ऑफिसवर किती कोटींची कमाई केली ते जाणून घेऊया.

पहिल्या दिवशी सिनेमाला कमी प्रतिसाद मिळाला होता. या सिनेमाने प्रदर्शनाच्या दिवशी १९ लाख रुपये इतकी कमाई केली होती.

पहिल्या दिवशी सिनेमाला फार कमाई करता आली नसली तरी वीकेंडला या सिनेमाने जवळपास १ कोटीपर्यंत कमाई केली होती.

शनिवारी म्हणजेच 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सिनेमाने ५२ लाखांचा गल्ला जमवला. तर रविवारी सिनेमाला ४६ लाख रुपये कमाई करता आली.

सोमवारी पुन्हा सिनेमाच्या कमाईत घसरण दिसून आली. या सिनेमाने सोमवारी १० लाख रुपयांची कमाई केली.

तर मंगळवारी 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाने १६ लाख रुपये कमावले आहेत.

आत्तापर्यंत 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाने १.४३ कोटींचा गल्ला जमवला आहे. आता येत्या दिवसांत बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा भगवा फडकवणार का? हे पाहावं लागेल.

'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाचं बजेट हे १३ कोटी आहे. या सिनेमात अभिनेता सिद्धार्थ बोडके छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे.

त्याच्यासोबत सिनेमात सिद्धार्थ जाधव, मंगेश देसाई, पृथ्विक प्रताप, रोहित माने, सयाजी शिंदे, शशांक शेंडे, बालकलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.