प्रिया बापटने स्टायलिश अंदाजात दिल्या पोज, नव्या लूकने वेधले चाहत्यांचे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 15:14 IST2021-12-06T14:56:03+5:302021-12-06T15:14:52+5:30
मराठीसह हिंदी सिनेमा, मालिका आणि नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट.

आपल्या अभिनयाने ही तिन्ही माध्यमं प्रियाने गाजवली असून रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे.
मराठीसह हिंदी सिनेमात प्रियाने विविध दर्जेदार आणि आव्हानात्मक भूमिका साकारल्या आहेत.
सोशल मीडियावर प्रिया प्रचंड सक्रीय असते.
सोशल मीडियावर तिचे स्टायलिश फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांची वाहवा मिळवत असते.
नुकतेच तिचे नवीन फोटो समोर आले आहेत.
लाल रंगाच्या ड्रेसमध्ये तिचा विविध पोज पाहायला मिळत आहे.
या ड्रेसमध्ये प्रियाच्या अदा कुणालाही घायाळ करतील अशाच आहेत.
हे फोटो पाहून चाहते तिच्यावर फुल ऑन फिदा होत आहेत.
दिवसेंदिवस प्रिया फॅशनबाबत बरीच सजग बनली आहे.