प्रिया बापटचं नवं फोटोशूट, तिची स्माईल पाहून चाहते पडले प्रेमात, See Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 20:09 IST2019-09-09T20:06:30+5:302019-09-09T20:09:00+5:30

अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते.

ती नेहमी सोशल मीडियावर फोटोही शेअर करत असते आणि या फोटोंतून ती प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडताना दिसते. मात्र नुकताच प्रियानं इंस्टाग्रामवर हिरव्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर केला आहे.

प्रियाने नुकताच इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती खूप सुंदर दिसते आहे. हा फोटो शेअर करून प्रियानं लिहिलं की, पारंपारिक भारतीय वेशातून थोडा ब्रेक घेतला आहे. या सुंदरतेची प्रशंसा करण्यासाठी रोखू शकत नाही.

प्रिया बापटच्या या फोटोला पसंती मिळत असून त्यावर तिचे चाहते कमेंट्स करत आहेत. तिच्या या फोटोवर सेक्सी, जलपरी व सुंदर अशा कमेंट्स चाहते करत आहेत.

काही महिन्यांपूर्वी प्रियाची सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिज प्रदर्शित झाली होती